शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

समांतर रस्त्यांचा विषय बनलाय ‘भाजपा’साठी ‘गले की हड्डी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:54 IST

विश्लेषण

ठळक मुद्दे ‘नही’च्या अधिकाऱ्यांपुढे भाजपा मंत्र्यांचेही चालेना निवडणूक जवळ आल्याने खासदार मात्र हैराण

-सुशील देवकरजळगाव: शहरातून जाणाºया राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांचा विषय भाजपासाठी ‘गले की हड्डी’ बनला आहे. भाजपाचे पॉवरफुल नेते व केंद्री रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याच खात्याचा हा विषय असताना व त्यांनीच याबाबत वारंवार आश्वासन दिलेले असतानाही गेल्या काही वर्षांपासून डीपीआर मंजुरीच्या प्रक्रियेबाबत सातत्याने सुरू घोळ सुरूच आहे. एकतर भाजपाचे नेते केवळ पोकळ आश्वासने देत असून त्यांना हे काम प्रत्यक्षात करावयाचे नाही किंवा ‘नही’च्या अधिकाºयांपुढे त्यांच्या खात्याच्या मंत्र्यांचेही चालत नाही, असेच चित्र यातून दिसून येत आहे.यापूर्वी मनपात भाजपाची सत्ता नसल्याने व समांतर रस्त्यांचा विषय हा शहराचा जिव्हाळयाचा विषय असल्याने राज्यात व केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाकडून हेतुपुरस्करपणे हे काम रखडवले जात असल्याचा आरोप होत होता. मात्र आता मनपातही भाजपाची सत्ता आल्यानंतर तरी जळगावकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला हा विषय भाजपाचे आमदार, खासदार, मंत्री तातडीने मार्गी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र आता लोकसभा निवडणुक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली असतानाही हा प्रश्न तातडीने निकाली काढणे भाजपाला जमलेले नाही. गडकरी यांनी याबाबत आश्वासन देऊनही ते तातडीने हा विषय मात्र मार्गी लावू शकलेले नाही. ‘नही’चे अधिकारी या समांतर रस्त्याचा डीपीआर त्यांच्या नियम, निकषांवर तपासून तरी मार्गी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यात सातत्याने घोळ घालणेच सुरू आहे. त्यामुळे ‘नही’चे अधिकारी भाजपाच्या मंत्र्यांनाही जुमानत नसल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. त्यातच ‘नही’कडून सुरू असलेला एककल्ली कारभार यामुळे जनमानसात विनाकारण असंतोष पसरत आहे. ‘नही’ने लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतलेले नसल्याने लोकप्रतिनिधींकडूनही श्रेय घेण्याच्या नादात चुकीची माहिती पसरविली जात आहे.आर्थिक अडचणीचे कारणही शक्यमहामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामही शासनाने ७०:३० या हिस्सेदारीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कामांना शासनाने आर्थिक अडचणीमुळे मोबीलायझेशन अ‍ॅडव्हान्सदेखील मक्तेदारांना दिलेला नाही. तरीही मक्तेदाराने घरातून पैसे टाकून चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात केली. मात्र नीरव मोदी प्रकरणामुळे बँका या मक्तेदारांना या कामासाठी कर्जही द्यायला तयार नाहीत. त्यामुळे या कामांची कोंडी झाली आहे. तरसोद ते फागणे टप्प्याचे काम याच कारणामुळे गेल्या काही महिन्यांपासून ठप्प झाले आहे. तर दुसºया टप्प्याचेही काम याच मार्गावर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मोठमोठ्या घोषणा करणाºया भाजपा नेत्यांची त्यामुळे पंचाईत झाली आहे.