शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

कनोसा कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये बॉम्ब!

By admin | Updated: November 4, 2015 00:01 IST

अफवा : शाळेच्या दूरध्वनीवर निनावी फोनवरून धमकी, बॉम्बशोधक पथकाची तपासणी

धुळे : वेळ साधारण सकाळी 11 वाजून 20 मिनिटांची.. कनोसा कॉन्व्हेन्ट स्कूलच्या कार्यालयातील दूरध्वनी खणाणला.. पलीकडून बोलणा:या अज्ञात व्यक्तीने ‘तुमच्या शाळेत बॉम्ब ठेवला आहे, 10 मिनिटात स्फोट होईल’ अशी हिंदीत धमकी दिल्याने सर्वाच्या पायाखालची जमीन सरकली. शाळेच्या प्रशासनाने या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस अधिका:यांच्या फौजफाटय़ासह बॉम्बशोधक पथक शाळेत दाखल झाले. संपूर्ण परिसराची कसून तपासणी केल्यानंतर शाळेत बॉम्ब नसल्याची खात्री पटल्याने सर्वाचा जीव भांडय़ात पडला.‘आपके स्कूल में बॉम्ब रखा हैं, दस मिनट में बॉम्ब फटेगा’ असे सांगितले. सिस्टर सिल्विया यांनी कोण बोलताय? असे विचारले. परंतु त्या व्यक्तीने तत्काळ फोन ठेवला. या प्रकाराची माहिती सिल्विया यांनी लागलीच स्कूलच्या प्राचार्या सिस्टर रुथ यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लागलीच पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क केला.‘लुसी व स्टेफी’ या दोन प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने कसून चौकशी केली. सुमारे दोन तास ही तपासणी करण्यात आली. परंतु कोणतीही आक्षेपार्ह वस्तू त्यात आढळून आली नाही. खात्री पटल्यानंतर बॉम्बशोधक पथकाने शाळेत बॉम्ब नसल्याचे जाहीर केले.

एखादी आणीबाणीची घटना घडली तर यंत्रणा किती तत्पर आहे, याची चाचपणी करण्यासाठी पोलिसांकडून मॉकड्रील केले जाते. कनोसा हायस्कूलमध्ये घडलेला प्रकारदेखील मॉकड्रीलच असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. परंतु त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

शिक्षक रमले चेष्टामस्करीत

शाळेत बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी सुरू असताना कनोसा हायस्कूलचे काही शिक्षक चेष्टामस्करीत रमल्याचे चित्र होते. शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी निनावी फोनवरून आली होती. सुदैवाने ती अफवा ठरली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. परंतु याचे गांभीर्य शिक्षकांना नसल्याचे समोर आले.

मॉकड्रील’ची चर्चा

शहरातील चाळीसगाव रस्त्यावर असणा:या कनोसा कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये हा प्रकार मंगळवारी सकाळी 11 वाजेनंतर घडला. कनोसा हायस्कूलच्या (282680) क्रमांकाच्या दूरध्वनीवर 11.20 वाजेच्या सुमारास एक निनावी फोन आला. हा फोन शाळेतील सिस्टर सिल्विया यांनी रिसिव्ह केला. पलीकडून बोलणारी व्यक्ती हिंदीतून बोलत होती. त्याने

कसून चौकशी

कनोसा स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे, बॉम्बशोधक पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत सोनार घटनास्थळी दाखल झाले. शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने पोलिसांनी सर्व विद्याथ्र्याना वर्गातून मैदानावर नेले. त्यानंतर शाळेच्या संपूर्ण परिसरात बॉम्बशोधक पथकाने अत्याधुनिक उपकरणे, तसेच

यांनी केली तपासणी

बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत सोनार, पोलीस हवालदार सुरेश कोडगीर, वसंत गोंधळी, पोलीस नाईक किरण निकम, गोपाल सत्येसा, पोलीस शिपाई सत्तरसिंग खतावद, राकेश ठाकरे, संजीव ठाकरे, वसियोद्दीन शेख, हिरालाल वाल्हे यांच्यासह दहशतवादविरोधी पथकाचे अब्दुल्ला शेख, पठाण, माळी, मन्सुरी, सिसोदे यांनी तपासणी केली.

पालकांनी केली गर्दी

बॉम्बचे वृत्त वा:याच्या वेगाने शहरात पसरले. त्यामुळे धास्तावलेल्या पालकांनी कनोसा हायस्कूलजवळ एकच गर्दी केली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव हायस्कूलचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. पोलिसांनी बॉम्ब नसल्याचे जाहीर केल्यानंतर पालकांची भीती दूर झाली.