शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम, 12 डॉक्टर्सना नोटीस

By admin | Updated: April 17, 2017 16:30 IST

शासकीय निकषानुसार पथकाने ग्रामीण भागातील 50 डॉक्टरांची तपासणी केली

पाचोरा, जि. जळगाव, दि. 17 -  पाचोरा शहर व तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहिम शासनाच्या आदेशानुसार सुरू असून शासकीय निकषानुसार पथकाने ग्रामीण भागातील 50  डॉक्टरांची तपासणी केली. यापैकी 12 जणांच्या त्रुटी आढळल्याने  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी त्यांना नोटीस बजावल्या आहेत.वैद्यकीय सेवेसंदर्भात ठरवून दिलेल्या निकषानुसार डीएचएमएस, बीएचएमएस डॉक्टरांना होमिओपॅथीचीच प्रॅक्टीस करणे गरजेचे असते. मात्र काही डॉक्टर्स आयलोपॅथीची उपचार पद्धती अवलंब करीत आहेत. या शोध घेण्यासाठी पाचोरा तालुक्यात ग्रामीण भागामध्ये शोध पथक स्थापन केले असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, तहसीलदार बी.ए. कापसे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली बोगस डॉक्टरशोध पथक तपासणी सुरु आहे. ग्रामीण भागात आजपयर्ंत नगरदेवळा, पिंपळगाव हरेश्वर,  लोहार, कळमसरे, शिंदाड, नांद्रा, कुरंगी, लोहटार, भोजे कु:हाड, बाळद, अंतुर्ली आदी ठिकाणी तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय  अधिकारी डॉ. वाघ यांनी दिली  दरम्यान ग्रामीण भागात बरेच ठिकाणी बोगस डॉक्टर आहेत मात्र पथक येणार म्हणून अगोदरच असे डॉक्टर सावध झाल्याने तपासणी अभियानाचा फज्जा उडत आहे. पाचोरा शहरातदेखील शोध मोहीम सुरू असून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मंदार करंबलेकर यांच्या नेतृत्वखाली तपासणी सुरू आहे.