शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बिबटय़ाच्या हल्यात ठार झालेल्या वरखेडे येथील महिलेचा मृतदेह पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:15 IST

प्रशासनाला धरले धारेवर : उपाययोजनांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

ठळक मुद्देउपाययोजनांचे अश्वासनग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित

ऑनलाईन लोकमत

चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 16 - बुधवारी वरखेडे येथील दीपाली नारायण जगताप ही 25 वर्षीय महिला नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झाली. गुरुवारी सकाळी 10 वाजता  तिचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी प्रशासनाला जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. बिबटय़ाचा बंदोबस्त कधी करणार? अजून किती बळी घेणार? भारनियमन बंद करणार की नाही ? अशा प्रश्नांचा भडीमार केला. यामुळे तहसील कार्यालय परिसरात कार्यकत्र्यांची मोठी गर्दी झाली होती. कार्यकत्र्यांनी ठिय्या देऊन वानविभागाला जाब विचारला. बिबटय़ाला जेरबंद केल्याशिवाय मृतदेह येथून हलविणार नाही. अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. यावेळी चाळीसगाव वन्यजीव विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रय} केला. ठोस अश्वासन द्या, बिबटय़ाला जेरबंद करा. या मागणीवर आंदोलनकर्ते ठाम होते. बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झालेल्या दीपाली जगताप यांचे नातेवाईक, वरखेडे येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, प्रमोद पाटील, रामचंद्र जाधव, भगवान पाटील, सूर्यकांत ठाकूर,  पं.स.चे राष्ट्रवादी गटनेते अजय पाटील, दीपक पाटील, जगदीश चौधरी यांच्यासह शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, अॅड. रोहिदास पाटील, काशिनाथ गायकवाड, संजय ठाकरे,  काँग्रेस (आय)चे तालुकाध्यक्ष अनिल निकम यांच्यासह असंख्य कार्यकत्र्यांनी आंदोलन करुन संतप्त मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या. यावेळी प्रांताधिकारी शरद पवार, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील यांनी आंदोलकांची बाजू ऐंकून घेऊन कारवाई करण्याचे अश्वासन दिले.उपाययोजनांचे अश्वासनयावेळी प्रांताधिकारी शरद पवार यांनी भ्रमणध्वानीवरुन उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्याशी चर्चा करुन आंदोलकांचे म्हणणे त्यांच्या कानावर घातले. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी वनविभागामार्फत सात पिंजरे, ड्रोन कॅमेरे यासह कर्मचा-यांची कुमक वाढण्याचे ठोस अश्वासन रेड्डी यांनी दिले. वनविभागाचे संजय मोरे यांनी देखील वरखेडे सरपंचांना कारवाई करण्याबाबत लेखी अश्वासन दिल्यानंतर तासाभराने आंदोलन स्थगित करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांनी अखेर ताब्यात घेतले.