जळगाव : सिंधी कॉलनीतील कृष्णा बिल्डिंगच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ५५ ते ६० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. पांढरी दाढी, मिशी, अंगात राखाडी रंगाचा हाफ शर्ट व राखाडी पँट आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जुबेर तडवी करीत आहेत.
वडली येथे कीर्तन सोहळा
जळगाव : तालुक्यातील वडली येथे २१ ऑगस्ट रोजी रात्री गायन सम्राट ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलडाणा) यांच्या कीर्तनाचा जाहीर कार्यक्रम झाला. वडली येथील भजनी मंडळाने त्यांना साथ दिली. या कीर्तन सोहळ्याला पंचक्रोशीतील पाथरी, जवखेडा, डोमगाव, वावडदा, जळके, सामनेर व वराड, आदी गावांतील हजारो नागरिक आले होते. सामाजिक कार्यकर्ते अरुण लक्ष्मण पाटील यांनी आयोजन केले होते.