बोदवड : तालुक्यातील करंजी येथील ३९ वर्षाच्या तरुणांच्या संपर्कात सुमारे ६० नागरिक आले होते, त्यांचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले असून त्यात २० जणांचे अहवाला पॉझिटीव्ह आले आहे. पैकी एकाच परिवारातील भाऊबंदकीतील १९ जण कोरोना संक्रमित झाले आहे. २० जणांमध्ये १० वर्षाआतील दोन, २० वर्षाआतील तीन, ६० वर्षाआतील १२ तर ६० वर्षावरील तीन नागरिक आहेत. तसेच नाडगाव येथेही एक रुग्ण आढळला आहे.सदर प्रकारणाने खळबळ उडाली असून २० रुग्णांपैकी १९ जण हेर् ैएकाच परिवारातीलअसून करंजी येथे आजुबाजुला राहतात. तर एक जण जलचक्र गावातील असून तो रुग्ण संपर्कात आला होता. आणखी एक रुग्ण नाडगाव येथील पॉझिटिव्ह आला असून सोमवारी तालुक्यात पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या २१ झाली आहे.बोदवड येथील कोविड सेंटर मधून सदर २० कोरोना रुग्णांना भुसावळ येथे हलविण्यात आले आहे. तर नाडगाव येथील एक व्यक्ती जळगावला उपचार घेत आहे.ग्रामीण भागात आता कोरोनाने धडकी भरवली असून लहान बालकेही संक्रमित होत आहे. तर दुसरीकडे शहरात मात्र पूर्ण बाजारपेठ सुरू असून सोशल डिस्टन्सिंग सोबत मास्क वापरण आदीचा फज्जा उडत आहे.
बोदवड तालुक्यात भाऊबंदकीतील १९ जण कोरोनाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 17:19 IST