शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडमध्ये १२ लाखांच्या नाला खोलीकरणावर एका पावसाने फिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 17:19 IST

शहरातील नाल्याच्या खोलीकरणासाठी नगरपंचायतीने १२ लाख रुपये खर्च केले. मात्र शनिवारी पहिला पाऊस पडल्यानंतर याच नाल्याचे पाणी नेहमीप्रमाणे नाला परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसले.

ठळक मुद्देनाल्या काठच्या घरात पावसाचे पाणीठेकेदारावर कारवाईची मागणी

बोदवड, जि.जळगाव : शहरातील नाल्याच्या खोलीकरणासाठी नगरपंचायतीने १२ लाख रुपये खर्च केले. मात्र शनिवारी पहिला पाऊस पडल्यानंतर याच नाल्याचे पाणी नेहमीप्रमाणे नाला परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसले. यामुळे १२ लाखांच्या नाला खोलीकरणावर एकाच पावसाने पाणी फिरल्याचे म्हटले जात आहे.शहरातून पंजाब जिनिंग ते हिरवा तलाव, शिवद्वार पूल, प्रभाग क्रमांक सहाचा पूल, कुरेशी वाडा, भीमनगर परिसर, नेरकर कॉलनी व शेवटी दत्त कॉलनी परिसराच्या पुढे वाहत जाणारा नाला असून, या नाल्यावरच गत दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निधीतून १२ बांध करण्यात आले होते. तर याच नाल्यावर गत वर्षी नगरपंचायतीकडून सुमारे १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून नाल्याचा शहरातून जाणारा भाग व नाला खोलीकरण, दुरुस्तीकरणाची निविदा काढण्यात आली होती.भुसावळ येथील ठेकेदाराने या नाल्याचे खोलीकरण तसेच दुरुस्तीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यात काही ठिकाणी नाला खोल करण्यात आला होता, तर इतर ठिकाणी मात्र नाला तसाच सोडून देण्यात आल्याने काम तसेच पडले आहे. वर्ष उलटत आले. तरी या प्रभाग क्रमांक सहामध्ये पूर्णपणे खोलीकरण झाले नाही. तसेच शिवद्वाराजवळच्या जवळील नाल्याचे काम झाले नसल्याने या नाल्यात मोठी झाडी झुडपे वाढली आहेत. पूर्ण पावसाचे पाणी या नाल्यात अडकून पडत आहे.पावसाळ्यात नेरकर कॉलनी तसेच भीमनगरच्या नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना खोलीकरण न झाल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागते. नगरपंचायतीकडून या नाल्याचे काम घेतलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण चौकशी केल्याशिवाय ठेकेदाराला बिलही देण्यात येऊ नये, असे सांगण्यात आले आहे.सदर १२ लाख रुपयांचे काम कोणत्या ठिकाणी झाले हेच आता दिसेनासे झाले आहे.याबाबत भीमनगर परिसरात राहणारे सुरेश तायडे यांची प्रतिक्रिया घेतली असता सदर पावसाळ्यात नाल्याच्या खोलीकरण न झाल्यामुळे आम्हाला अडचणीला सामोरे जावे लागत असून, ही समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.नगरपंचायतीचे आरोग्याधिकारी अमित कोलते यांच्याशी संपर्क साधला असता जा कामाचे निरीक्षण केल्याशिवाय बिल अदा केले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सदर काम घेणाºया कंपनीला सूचनाही दिली असल्याचे त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :GovernmentसरकारBodwadबोदवड