शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा शहरात सर्वत्र नाकेबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 15:05 IST

पारोळा शहरातील गावात येणारे सर्व रस्ते लाकडी दांड्याने बांधून नाकेबंदी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपारोळा शहरात सर्वच मुख्य रस्त्यांची झाली नाकेबंदीओळख वा ओळखपत्राशिवाय गावात प्रवेश बंद

पारोळा, जि.जळगाव : कोरोना रोखण्यासाठी घरात राहण्यापेक्षा अनेक जण गावात फिरताना जास्त दिसत आहे. अशा परिस्थितीत पारोळा शहरातील गावात येणारे सर्व रस्ते लाकडी दांड्याने बांधून नाकेबंदी करण्यात आली आहे. ओळखपत्र वा ओळखीशिवाय गावात प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे अनेकांना शिस्त लागणार आहे.नगराध्यक्ष करण पवार, मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे व आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान यांनी याबाबत निर्णय घेत ही नाकेबंदीची मोहीम शहरात राबविली जात असल्याचे सांगितले.फक्त अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील लोकांना गावात प्रवेश मिळणार आहे. तेही पालिकेने दिलेल्या ओळखपत्रावर शहरात प्रवेश राहणार आहे. एकही मोटारसायकल, चारचाकीला गावात प्रवेश राहणार नाही. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी, पोलीस व्हॅन, अधिकारी वर्ग यांच्या वाहनांसाठी कजगाव चौफुली, पीर दरवाजा, तलाव गल्लीतून गावात प्रवेशासाठी मार्ग तोही संवेदनशील अत्यावशक सेवेसाठी चालू राहणार आहे.शहरात शनी मंदिर दरवाजा, झपाट भवानी दरवाजा, मांतग दरवाजा, शिवाजी महाराज पुतळा जवळील दरवाजा, बसस्थानकावर जवळील बोगदा, दिल्ली दरवाजा, धरणगाव चौफुली दरवाजा अशी सर्व शहरात प्रवेशद्वाराची नाकाबंदी करण्यात आली आहे.त्यामुळे आता शहरात या नाकेबंदीवर पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. कोणालाही विनाकारण गावात प्रवेशापासून रोखण्यात येणार आहे. या ठिकाणी अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद करण्यात येणार आहे व विनाकारण फिरणाºयावर मग येथूनच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यParolaपारोळा