पारोळा बस स्थानकाजवळ घाण पाण्याने नाला झाला ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 08:51 PM2019-09-17T20:51:02+5:302019-09-17T20:51:05+5:30

नाल्याच्या वरून पाणी : एक जखमी, प्रवाशांची कसरत

A block drained by dirty water | पारोळा बस स्थानकाजवळ घाण पाण्याने नाला झाला ब्लॉक

पारोळा बस स्थानकाजवळ घाण पाण्याने नाला झाला ब्लॉक

googlenewsNext

पारोळा : पारोळा येथील बस स्थानक परिसरातील बोगद्याजवळील नाल्यात घाण अडकल्याने नाला ब्लॉक झाला आहे. त्यावरून पाणी वाहत असल्याने एक नागरिक पडून जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.
शहरातील बस स्थानकातून बाजारपेठ व गावात जाण्यासाठी असलेल्या बोगद्याजवळील रस्त्यावर नाला आहे. पावसामुळे नाल्यातील पाईपमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून घाण अडकलेली आहे. त्यामुळे नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. वाहत्या पाण्यामुळे नाल्याच्या ढाप्याच्या आजूबाजूला खड्डे पडले आहेत. या परिसरातून दिवसातून हजारो लोक वावरतात. नागरिकांना वाहत्या पाण्यातून रस्ता काढावा लागत आहे. तसेच पाऊस पडल्यानंतर परिसरात दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचलेले असते. त्यामुळे बस स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे व नागरिकांचे हाल होत आहेत.
इतकेच नव्हे, तर नगरपालिकेचे काही कर्मचारीदेखील बाहेरगावाहून अप-डाऊन करतात. त्यांनीदेखील संबंधित विभागाला या प्रकाराबाबत कळविले नाही. याबाबत बस स्थानक प्रशासनानेही उपाययोजना करण्याचे मनावर घेतले नाही हे विशेष.

लोकमत न्यूज नेटवर्क

सायकलस्वार जखमी
या पाण्यातून जात असताना काहीजण पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. १६ सप्टेंबर रोजी येथील सायकलस्वार विनायक पाटील हे या घाण पाण्यातून मार्ग काढत असताना खड्ड्यात पडले. त्यांच्या तोंडाला व नाकाला जबर जखम झाली. अशा घटना सातत्याने घडत आहेत. तरीदेखील पालिकेकडून घाण काढली जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. या नाल्यात कचरा, प्ल्ॉस्टिच्या वस्तू आहेत. त्यामुळे तो ब्लॉक होऊन घाण पाणी साचले आहे. मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. पालिकेने नाल्यातून घाण काढावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सर्वत्र जोरदार पाऊस आहे त्यामुळे कामाला विलंब झाला असेल, याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना करून लवकरात लवकर नाला साफ केला जाईल.
-व्ही.एम.इन्सुलकर, आरोग्य निरीक्षक, नगरपालिका, पारोळा

Web Title: A block drained by dirty water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.