शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी आंदोलन : जळगावात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:14 IST

सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

ठळक मुद्देमनपा निवडणुकीमुळे शांततेने आंदोलनमराठवाड्याच्या बसफे-या दुपारपर्यंत रद्द

जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २९ रोजी सकल मराठा समाजातर्फे काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय बुधवारी सायंकाळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला.मुक्ताईनगर परिसरातील मराठा भवन येथे झालेल्या या बैठकीस मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष सुरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे अ‍ॅड.कुणाल पवार, अ‍ॅड.सचिन पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.मनपा निवडणुकीमुळे शांततेने आंदोलनसध्या मराठा आरक्षणावरून राज्यभरात तणावाचे वातावरण आहे. सकल मराठा समाजातर्फे जळगावात देखील मंगळवारी शांततेत आंदोलन करण्यात आले. आता पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. जळगावात सध्या मनपाची निवडणूक आहे. त्यातच आंदोलन सुरु केल्यास त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता असल्याने पदाधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन करण्यात आले.मुख्यमंत्री २९ रोजी प्रचारासाठी शहरात येणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २९ रोजी जळगावात प्रचारासाठी येत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी होत असलेल्या टाळाटाळच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विभागीय अध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मराठवाड्याच्या बसफे-या दुपारपर्यंत रद्दराज्यभरात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव आगारातून मराठवाड्याकडे जाणा-या एसटी महामंडळाच्या सर्व फे-या बुधवारी दुपारपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या. दुपारी साडेबारानंतर बसेस सुरु करण्यात आल्या. औरंगाबाद आगाराने राज्यातील सर्व आगारांना औरंगाबादला बसेस न पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जळगाव आगारासह इतर तालुक्यातील आगारांमधून औरंगाबादकडे जाणाºया सर्व बसेस २४ जुलै रोजी सकाळी दहानंतर रद्द करण्यात आल्या होत्या.राज्यभर मराठा आंदोलन सुरु असल्याने जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. जळगाव शहरात मनपाची निवडणूक सुरु आहे, त्यासाठी बाहेरुन विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, नेते व मंत्री यांचे दौरे होत आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख लोकांना पोलीस संरक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना राजशिष्टाचारानुसार बंदोबस्त आहे. निवासस्थानी अतिरिक्त बंदोबस्त नाही.-दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव