शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातही भाजपाची जोरदार मुसंडी, युतीमुळे लोकसभेतही राष्टÑवादी कॉँग्रेसला मतदारांनी नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:45 IST

विधानसभेला युतीलाच होणार फायदा

अजय पाटीलजळगाव : आठ महिन्यांपूर्वी झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाने ७५ पैकी ५७ जागा जिंकत स्पष्ट बहूमत मिळवत मनपात सत्ता स्थापन केली होती. हेच यश भाजपाने लोकसभेतही कायम ठेवत शहरात मोठी मुसंडी मारली.जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार उन्मेश पाटील यांनी मोठे मताधिक्य घेवून राष्टÑवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा पराभव केला आहे. या विजयात जळगाव शहरात भाजपाला प्रचंड आघाडी मिळाली आहे. आठ महिन्यांपुर्वी झालेल्या जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाने ७५ पैकी ५७ जागा जिं कत स्पष्ट बहुमत मिळवत मनपात सत्ता स्थापन केली होती. हेच यश भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीत कायम ठेवत मोठी मुसंडी घेतली आहे.त्यातच लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती झाल्यामुळे मनपातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या १५ नगरसेवकांनी देखील शहरात भाजपाचे उमेदवार उन्मेश पाटील यांच्यासाठी प्रचार केल्यामुळे त्याचा फायदा उन्मेश पाटील यांना झाला.जळगाव शहरात राष्टÑवादी कॉँग्रेसचा फारसा जनाधार नाही. मनपा निवडणुकीत ४३ जागा लढविल्या होत्या. त्यात ४० जागांवरील उमेदवारांचे डिपॉजीट जप्त होवून एकही जागेवर राष्टÑवादीचे नगरसेवक विजयी झाले नव्हते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीला शहरात फारसे माताधिक्य मिळण्याची शक्यता ही नव्हतीच. मात्र, गुलाबराव देवकर हे शहरवासियांना उन्मेश पाटील यांच्यापेक्षा परिचीत होते. त्यामुळे त्यांना शहरात आघाडी मिळेल अशी आशा होती. मात्र, त्यांना कोणताही फायदा झाल्याचे या निकालात दिसून येत आहे.सुरेशदादा जैन यांच्या पाठींब्यामुळे मिळाला फायदाशहरात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी देखील भाजपाच्या प्रचारात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्यानंतर जळगाव शहराचे वातावरणच युतीमय झालेले दिसून आले. सुरेशदादा जैन यांचे वलय शहरात मोठ्या प्रमाणात असून, त्याचा फायदा भाजपाला या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झाला आहे. तसेच भाजपा व शिवसेनेचे संघटन देखील शहरात राष्टÑवादी कॉँग्रेसपेक्षा चांगले असल्याने या संघटनांच्या जोरावर मतदान देखील चांगल्या प्रकारे काढण्यात आले. या ठिकाणी भाजपा राष्टÑवादीपेक्षा वरचढ ठरली.विधानसभेला युतीलाच होणार फायदा ?आता या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीदरम्यान देखील सेना-भाजपाच्या युतीला होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या विद्यमान आमदार हे भाजपाचे आहेत. मात्र, या जागेवर शिवसेनेचा दावा आहे. त्यामुळे विधानसभेलाही सेना-भाजपाची युती झाल्यास ही जागा कोणत्या पक्षाला जाते हे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. युती झाल्यास ही जागा सेना किंवा भाजपाला गेली तरीही दोन्ही पक्षाना शहरात विजय मिळणे सोपे जाणार आहे. मात्र, युती न झाल्यास शहरात शिवसेना व भाजपातच खरी लढत पहायला मिळणार आहे.सेना-भाजपाची युती झाल्यामुळे मनपातील तब्बल ७२ नगरसेवकांनी भाजपा उमेदवारासाठी शहरात काम केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शहरी जनमाणसावर असलेला करिष्मा या निवडणुकीत दिसून आला.सुरेशदादा जैन यांची ताकद देखील भाजपा उमेदवाराचा मागे राहिल्याने उन्मेश पाटलांना फायदा झाला. राष्टÑवादी कॉँग्रेसची शहरात नसलेल्या संघटनाचा फटका राष्टÑवादीला बसला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालJalgaonजळगाव