शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सीमा भोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 20:49 IST

उपमहापौरपदी डॉ. अश्विन सोनवणे

जळगाव : जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सीमा भोळे यांची तर उपमहापौरपदी डॉ. अश्विन सोनवणे यांची निवड करण्यात आली.जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरांच्या निवडीसाठी मंगळवारी सकाळी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात सभा झाली. स्पष्ट बहुमत व शिवसेनेने महापौर निवडीवर बहिष्कार टाकल्याने महापौरपदी सीमा भोळे तर उपमहापौरपदी डॉ.आश्विन सोनवणे यांची निवड होण्याची शक्यता आधीपासूनच वर्तविली जात होती. भाजपाने ७५ पैकी ५७ तर शिवसेनेला १५ आणि एमआयएमने ३ जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी ३८ नगरसेवकांची आवश्यकता असताना हात उंचावून झालेल्या मतदानात सीमा भोळे यांना ५६ मते मिळाली. या वेळी एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिले.दरम्यान, शिवसेनेतर्फेही महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेतर्फे चमत्कार होईल, असे सांगितले जात होते.शिवसेनेता बहिष्कारनागरिकांच्या समस्यांबाबत लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यासाठी गेलेले शिवसेना गटनेते अनंत जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी सत्तेचा दुरुपयोग केला. तसेच महापौर व उपमहापौर निवडीदरम्यान भाजपाचे नगरसेवक संपर्कात असल्यानेच आमदार भोळे यांनी जोशींवर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप शिवसेनेचे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला होता. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने महापौर व उपमहापौर निवडीवर बहिष्कार टाकला.मनपातील पक्षीय बलाबलभाजपा- ५७शिवसेना - १५एमआयएम- ०३

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव