अजय पाटील / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ७ - महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नेतृत्व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. नुकत्याच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मुुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात अंतर्गत वाद आहे. त्याचा फटका मनपा निवडणुकीत बसू नये म्हणून पक्षाने खडसे-महाजन यांना मनपा निवडणुकांचे नेतृत्व न देता या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊ शकणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे सूत्रे सोपविली आहे.चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाला विरोध होण्याची शक्यता नाही. खडसे व महाजन यांच्या पदाधिकाºयांना सोबत घेवून निवडणूक जिंकण्याचा विश्वास पक्षाने त्यांच्यावर टाकला आहे. ते हे आव्हान कसे पेलतात? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.पालकमंत्र्यांचा ‘वीकेण्ड’ आता शहरातचमनपा निवडणुकीच्या तयारीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आता आठवड्यातील शनिवार व रविवारी शहरातच राहणार आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील हे सोमवार, ९ रोजी शहराच्या दौºयावर येत असून, त्यामुळे सायंकाळी ६ वाजता अजिंठा विश्रामगृहात भाजपा नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी.पाटील, आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल उपस्थित राहणार आहेत. मनपा आरक्षण सोडत, प्रारूप प्रभाग रचनेत नगरसेवकांना झालेला फायदा व नुकसानीचा आढावा घेणार असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली.दोन्ही आमदारांनाही घेणार सोबतपालकमंत्र्यांच्या दिमतीला आमदार सुरेश भोळे व चंदुलाल पटेल असतील. गिरीश महाजन समर्थक नगरसेवकांची जबाबदारी चंदुलाल पटेल यांच्याकडे, तर खडसे समर्थक नगरसेवकांची जबाबदारी सुरेश भोळे यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना एकसंध ठेवून ही निवडणूक लढण्यावर भाजपाचा भर असेल. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी युतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्याबाबत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागून आहे.
जळगाव मनपा निवडणुकीसाठी भाजपाचे नेतृत्त्व पालकमंत्र्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 12:53 IST
खडसे-महाजन वादाचा परिणाम
जळगाव मनपा निवडणुकीसाठी भाजपाचे नेतृत्त्व पालकमंत्र्यांकडे
ठळक मुद्देसोमवारी नगरसेवकांची बैठकदोन्ही आमदारांनाही घेणार सोबत