शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

रावेर पंचायत समिती सभापतीपदी अखेर भाजपच्या कविताबाई कोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 13:57 IST

रावेर पंचायत समिती सभापतीपदी अखेर भाजपच्या कविताबाई कोळी यांची निवड झाली.

ठळक मुद्देउपसभापतीपदी धनश्री सावळे महाविकास आघाडीचे अखेर कवित्वच ठरण्याचा ‘लोकमत’चा अंदाज ठरला बरोबर

रावेर : पंचायत समितीच्या सभापती पदासाठी भाजपच्या तांदलवाडी गणातील कविता हरलात कोळी तर उपसभापतीपदी केर्‍हाळे गणातील भाजपच्या धनश्री संदीप सावळे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने व छाननअंती ते वैध ठरल्याने अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले.  राष्ट्रवादीकडून भाजपचे दोन सदस्य वाटेवर तर भाजपकडून राष्ट्रवादीचे दोन सदस्य भाजपच्या वाटेवर असे बुमरँग करण्याचे डावपेच खेळत काहींनी काठी उपटून साप पळवण्यासाठी कवित्व रंगवले होते. मात्र, भाजपकडे बारापैकी आठ सदस्यांचे निर्विवाद बहुमत असताना तथा शिवसेना - भाजपचे साप मुंगसाचे वैमनस्य असले तरी कविताबाई कोळी व सेनेच्या सविताबाई कोळी या आप्तेष्ट असल्याने तथा माजी मंत्री एकनाथ खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या लढाईतही शिवसेनेचा सदस्य महाविकास आघाडीला समर्थन करण्याची आशंकाच होती.       त्या अनुषंगाने सोमवारी सभापती पदासाठी भाजपच्या तांदलवाडी गणातील कविता हरलात कोळी तर उपसभापतीपदी केर्‍हाळे गणातील भाजपच्या धनश्री संदीप सावळे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने व छाननअंती ते वैध ठरल्याने अध्यासी अधिकारी तथा तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित केले. नवनिर्वाचित सभापती कविताबाई कोळी व उपसभापती धनश्री सावळे यांचे अध्यासी अधिकारी उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, मावळते सभापती जितेंद्र पाटील, मावळते उपसभापती जुम्मा तडवी, पी के महाजन, माधुरी नेमाडे, अनिता चौधरी, योगिता वानखेडे, योगेश पाटील, दीपक पाटील, प्रा.डॉ.प्रतिभा बोरोले व रूपाली कोळी यांनी सत्कार केला.      दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, वेटी बचाओ बैठी पढाओचे राष्ट्रीय समन्वयक डॉ राजेंद्र फडके, जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी सभापती सुरेश धनके, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, डॉ.विजय धांडे, भाजप तालुकाध्यक्ष  राजन लासुरकर, तालुका सरचिटणीस  महेश चौधरी, सी.एस.पाटील, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, कृ.उ.बा.सभापती श्रीकांत महाजन, प्रल्हाद पाटील, गोपाळ नेमाडे, महेश पाटील, अमोल पाटील, सुनील पाटील आदी कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.  

टॅग्स :PoliticsराजकारणRaverरावेर