शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगावची जागा भाजपच लढविणार - पालकमंत्री गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:33 IST

शिवसेनेकडूनही केला जातोय दावा

जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत वरिष्ठ निर्णय घेणार आहे, मात्र ज्या जागांवर भाजपचे आमदार आहेत त्या जागा सोडून इतर जागांबाबत चर्चा होईल, अशी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पिंप्राळा रथोत्सवादरम्यान माध्यमांशी बोलताना दिली़ त्यामुळे जळगावची जागा भाजपच लढवेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत़जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी निवडणूक लढावी अशी आग्रही भूमिका सुनील महाजन यांनी जाहीर केली होती़ त्यावर सुरेशदादा जैन दुजोरा दिला होता़ शिवसेना ही जागा लढविण्यास आग्रही असताना आता गिरीश महाजन यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे या जागेवरून पुन्हा भाजप-सेनेत रस्सीखेच होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़ भाजप- सेना युती असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव शहर विधानसभेची जागा कोण लढविणार याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील़ मात्र, ज्या जागांवर भाजपचे आमदार स्थित आहेत, त्या जागा सोडूनच बोलणी केली जाईल, अशी प्राथमिक चर्चा झाल्याचे गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले़मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणारमराठा समाजाने जागतिक विक्रमाचे असे मोर्चे शांततेत काढले़ मराठा आरक्षण हे थातूर मातूर स्वरूपात दिलेले नसून ते पूर्ण अभ्यासानिशी दिलेले आरक्षण आहे़ उच्च न्यायालयात मंजूरी मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसून पंधरा दिवसांचा अवधी दिला आहे़ त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही हे आरक्षण टिकेल, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सत्कार समारंभाप्रसंगी व्यक्त केला़पाऊस पडून, नदी, धरणे भरून दुष्काळ मिटू दे दे, असे साकडेही त्यांनी विठ्ठलाकडे घातले़ मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल यावेळी गिरीश महाजन, गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला़ गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर जायचे की, नाही यावर प्रश्नचिन्ह असल्याने आपण त्या ठिकाणी गेलो होतो़ आंदोलन सुरू होते, जाळपोळ सुरू होती़ त्यावेळी जेव्हा मराठा समाजाला आरक्षण देणार त्याचवेळी आपण पंढरपूरात पाय ठेवू असे मुख्यमंत्री म्हणाले होते़ व आज त्यांनी समाजाला आरक्षण दिले, असे महाजन यांनी यावेळी सांगितले़मुुख्यमंत्री युतीचाच : गुलाबराव पाटीलमुख्यमंत्री युतीताच होणार असे मत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील अशा चर्चा रंगत असताना आता मुख्यमंत्री हा युतीचाच होईल, मात्र तो कोणत्या पक्षाचा असेल? हे नंतर ठरेल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव