शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात भाजपा प्रदेश प्रवक्त्यांकडून स्थानिक प्रश्नांना बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 12:29 IST

के शव उपाध्ये यांनी केली केवळ राफेलवरच चर्चा

जळगाव : भाजपाचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शनिवारी येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत केवळ राफेल विषय मांडत राहूल गांधी यांच्यावर टिका केली. मात्र स्थानिक प्रश्नांवर उत्तरे देण्याचे टाळून राफेलवरच पक्षाची बाजू मांडली.भाजपा कार्यालयात ही पत्र परिषद शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान झाली. यावेळी आमदार सुरेश भोळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, अस्मिता पाटील, तारा पाटील, सुभाष शौचे, नगरसेवक विशाल त्रिपाठी, सुनील माळी, मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.यावेळी उपाध्ये म्हणाले की, केंद्रातील भाजपा सरकारने गेल्या साडेचार वर्षात पारदर्शक कारभार केला आहे. कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप भाजपावर नसल्याने कॉँग्रेसकडून कोणत्याही मुद्यावर केंद्राला घेरता येत नसल्यानेच राफेल कराराबाबत केंद्र सरकारवर बिनबुडाचे आरोप लावले जात आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लिन चिट दिली असल्याने राहुल गांधींनी आता देशाची माफी मागितली पहिजे अशी मागणी त्यांनी केली.केशव उपाध्ये यांनी सांगितले की, राफेल करारासंदर्भात नियम व अटी काँग्रेस सरकारच्या काळात ठरल्या होत्या.२००८ ते २०१४ पर्यंत काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. त्यावेळी भारतीय संरक्षण दलाला अत्याधुनिक लढाऊ विमानांची गरज होती. त्यासाठी राफेल विमानांच्या खरेदीचा करार अत्यावश्यक होता. मात्र, असे असताना काँग्रेस सरकारला करार करता आला नाही. भाजपने देशाच्या सुरक्षेचा विचार करून राफेल करार पारदर्शक पद्धतीने केला, असेही ते म्हणाले.काही तासच थांबलेकेशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत राफेल ऐवजी इतर कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्याची टाळले. ते शनिवारी दुपारपर्यंत शहरातच होते. त्यांनी काही ठिकाणी भेटी दिल्या आणि दुपारी ते नाशिकसाठी रवाना झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव