शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ‘योग्य वेळ’ एकनाथराव खडसेंनी ठोकरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 13:02 IST

जळगावात नाराजी व्यक्त होताच गुंडाळली पत्रपरिषद

ठळक मुद्देदानवे म्हणाले, योग्य वेळ आल्यावर खडसेंना न्याय मिळेलखडसे म्हणाले, तशी योग्य वेळ येणारच नाही

जळगाव- मनपा निवडणुकीनिमित्त आयोजित भाजपाच्या पत्रपरिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, योग्य वेळ आल्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना नक्कीच न्याय दिला जाईल. परंतु दानवे यांच्या या उत्तरानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांंनी लगेच सांगितले की, तशी योग्य वेळ येणारच नाही... खडसे यांच्या वक्तव्यातून जाहीरपणे नाराजी व्यक्त झाल्याने पत्रपरिषद आटोपती घेण्यात आली.शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसीत दानवे यांच्या हस्ते भाजपाच्या मनपा निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशनही झाले. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे आदींची मुख्य उपस्थिती होती.याचबरोबर सध्या मुख्यमंत्री बदलाचे वारे सुरु आहे का? असे विचारले असता दानवे यांनी असे कोणतेही वारे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले काम करीत आहेत, असे स्पष्टीकरण दिले. तर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेत खडसे यांचे पुनर्वसन केले जाईल अशीही चर्चा असल्याचे पत्रकारांनी सांगितल्यावर या प्रश्नांची उत्तरे देणे मी जरुरी समजत नाही, असे सांगून दानवे यांनी पत्रपरिषद गुंडाळली.तत्पूर्वी खडसे समर्थकांनी दानवे यांना खडसे यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांना घेरले. त्यांचे म्हणणे दानवे यांनी समजून घेतले.खडसे यांच्यावरील गैरव्यवहाराच्या आरोपानंतर भाजपाने त्यांना मंत्रीपदावरुन दूर केले. दरम्यानच्या काळात अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो आणि चौकशी समितीचीही क्लीन चिट खडसे यांना मिळाली. यानंतरही मात्र खडसे यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही. पक्षातर्फे नेहमीच सांगण्यात आले की, योग्य वेळी खडसेंना संधी दिली जाईल.. न्याय दिला जाईल... परंतु न्याय मिळालाच नाही. आणि आजही तेच उत्तर मिळाल्याने खडसे यांनी नाराजीने ‘ती’ वेळ कधीच येणार नाही, असे स्पष्टपणे पत्र परिषदेतच वक्तव्य केले.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगाव