शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बडतर्फी रोखण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरुन भाजप-शिवसेनेत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 21:56 IST

जळगाव : मनपा प्रशासनाकडून महासभेच्या मंजुरीसाठी आणलेले तीन कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी महासभेत अमान्य केले. हे विषय अमान्य केल्यामुळे ...

जळगाव : मनपा प्रशासनाकडून महासभेच्या मंजुरीसाठी आणलेले तीन कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी महासभेत अमान्य केले. हे विषय अमान्य केल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक इबा पटेल यांनी भाजप नगरसेवकांवर ही बडतर्फी थांबविण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केल्यामुळे भाजप नगरसेवक व शिवसेना नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. इबा पटेल व भाजपचे गटनेते भगत बालानी हे एकमेकांवर धावून गेल्यामुळे महासभेत चांगलाच गोंधळ झाला.महासभेत एकूण ११ प्रस्ताव मांडण्यात आले, त्यापैकी ७ विषयांना महासभेने मंजुरी दिली तर ३ विषय अमान्य करण्यात येवून एक विषय तहकूब ठेवण्यात आला. गोपी हंसकर, अनिल ढंढोरे व गंगाधर गायकवाड या तीन कर्मचाºयांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे प्रस्ताव प्रशासनाने विषयपत्रिकेत ठेवले होते.यावेळी भाजपकडून अ‍ॅड.शुुचिता हाडा व कैलास सोनवणे यांनी या कर्मचाºयांवर एकदम बडतर्फीची कारवाई न करता त्यांना नियमानुसार शिक्षा करुन सेवेत रुजू करण्याची सूचना करीत प्रशासनाचे प्रस्ताव अमान्य केले.कार्यादेशाअभावी ‘वॉटर पार्क’च्या आराखड्याचे काम रखडले४महासभेत गिरणा पंपिग स्टेशनवरील जुनी मशिनीरीचा लिलाव करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. यावेळी भाजपचे जितेंद्र्र मराठे यांनी या जागेवर ‘वॉटर पार्क प्रस्तावित केला असून त्यासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करण्यात असल्याची माहिती सभागृहात दिली. मात्र, त्याला प्रशासनाकडून कार्यादेश दिला जात नसल्याने हे काम थांबले असल्याने संताप व्यक्त केला.४गिरणा पंपीगच्या ठिकाणी आधीच ११ कर्मचाºयांची नियुक्ती केली असताना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज काय ? याबाबतचा प्रश्न सदाशिव ढेकळे यांनी उपस्थित केला. त्यावर या ठिकाणची मशिनरी चोरीला जाण्याची भिती असल्याने सुरक्षा रक्षक नेमला जाण्याची गरज असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.४मनपाचा मोकाट गुरांच्या कोंडवाड्याचा मक्ता नुतनीकरण करण्याच्या विषयावरुन सदस्यांनी मक्तेदारावर आरोप केलेत.४ शेतकºयांची गुरे पकडून त्यांची आर्थिक पिळवणुक केली जात असल्याबद्दल तक्रारी केल्यात. त्यामुळे मक्तेदाराला कोंडवाड्यासाठी स्वत:ची जागा वापरण्यास सांगावे मक्ता ५ वर्षासाठी न देता २ वषार्साठीच द्यावा अशी मागणीही सदाशिव ढेकळे यांनी केली.इबा पटेलांचे आरोप अन् भाजपा नगरसेवकांचा संताप४भाजपा नगरसेवकांनी तीन्ही प्रस्ताव अमान्य केल्यानंतर शिवसेना नगरसेवक इबा पटेल यांनी संबधित कर्मचाºयांची बडतर्फी रोखण्यासाठी पैसे घेतला असल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांवर केला. त्यांच्या आरोपानंतर भाजपाचे गटनेते भगत बालानी आक्रमक होवून नाव घेवून आरोप करा असे सांगत थेट इबा पटेल यांच्या अंगावर धावून गेले. तसेच या आरोपानंतर भाजपाचे इतर नगरसेवक देखील आक्रमक होवून इबा पटेल यांच्या समोर जावून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नगरसेवक व भाजपच्या इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला.प्रस्ताव अमान्य केल्याने कर्मचाºयांमध्ये चुकीचा संदेश जाईल- आयुक्त४मनपा प्रशासनाने तीन कर्मचाºयांना बडतर्फ करण्याचे प्रस्ताव योग्यच असून, एका प्रकरणात विभागीय आयुक्तांनी देखील बडतर्फी योग्यच असल्याची माहिती उपायुक्त अजित मुठे यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी हे प्रस्ताव सभागृहाने अमान्य केल्यामुळे भविष्यात मनपा कर्मचाºयांमध्ये चुकीचा संदेश जावून, कर्मचाºयांमध्ये शिस्त लावण्याचा प्रयत्नांना तडा जाईल त्यामुळे कर्मचाºयांची गुणवत्ता पाहून सभागृहाने निर्णय घ्यावा असेही आयुक्तांनी सांगितले.शाळा सुधरवा, भूसंपादनावर कोट्यवधी खर्च टाळाविकास मंजूर योजनेनुसार आरक्षण क्रमांक १३२ अंतर्गत मेहरूण शिवारातील जागा भूसंपादन करण्याचा प्रशासनाचा विषय देखील महासभेकडून मंजूर करण्यात आला. मात्र, या विषयावर शिवसेना नगरसेवकांनी आक्षेप घेतला. तसेच शहरात मनपा शाळांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली असून, अशा परिस्थितीत मनपाकडूून भूसंपादनासाठी ५ कोटी रुपये खर्च योग्य नसल्याचे सेना नगरसेवकांनी सांगितले. मात्र, सेना नगरसेवकांच्या मुद्यांची फारशी दखल महासभेत घेण्यात आली नाही. त्यानंतर मक्तेदारांची इसारा अमानत परत करणे, सोडत पध्दतीने ७६ घरकुल वाटप करणे या विषयांना मंजूरी देण्यात आली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव