शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षे कुठे होतात? तेव्हा गाव दिसलं नाही? ग्रामस्थांचा संताप, रक्षा खडसेंनी घेतला काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 21:07 IST

खासदार रक्षा खडसे यांच्या बैठकीत दोन गावांमध्ये उडाला गोंधळ; ग्रामस्थांनी विचारला जाब 

जळगाव:  रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे ह्या बिडगाव व वरगव्हाण येथे बैठकीसाठी आल्या होत्या. त्यावेळी आठ वर्षांत आमचे गाव कधी दिसले नाही का? आठ वर्ष कुठे होता, असा ग्रामस्थांकडून प्रश्नांचा भडीमार झाल्याने एकच गोंधळ उडाला. शेवटी खासदार खडसे यांना गावातून निघून जावे लागले. शुक्रवारी सकाळी बिडगाव व वरगव्हाण या दोन गावात हा प्रकार घडला.  मात्र असा प्रकार झाला नसल्याचे खासदार खडसे यांनी म्हटले आहे. 

खासदार रक्षा खडसे यांचा चोपडा तालुक्यात पाच दिवसांचा दौरा गुरुवारपासून सुरु झाला. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्या बिडगाव येथे पोहोचल्या. खासदार येणार असल्याने ग्रामपंचायत आवारात मोठी गर्दी जमली होती. बैठक सुरु होताच काही ग्रामस्थांनी खासदारांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आपण गेल्या आठ वर्षांपासून आमच्या गावात एकदाही आल्या नाहीत. तेव्हा कुठे होतात? आपणास आमचे गाव कधी दिसले नाही का? अनेक वेळा फोन करूनही समस्या सोडवणे, तर दूरच पण प्रतिसादही मिळत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगताच गोंधळास सुरुवात झाली. बिडगावप्रमाणेच वरगव्हाण येथेही हेच चित्र पहायला मिळाले.  सुरक्षा रक्षकांनी ग्रामस्थांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही गोंधळ वाढतच होता. प्रत्येक गावात जाणे कठीण- खडसेमतदार संघात १४०० गावे आहेत. प्रत्येक गावात जाणे कठीण जाते. मात्र त्यामुळे कामे होत नाहीत,  असे नाही समस्या सोडविण्यासाठी आपण आलो आहोत. शांततेत प्रश्न मांडा, असे आवाहन खासदार खडसे यांनी केले. तरीही गोंधळ सुरुच राहिला. त्यामुळे खासदारांनी बिडगाव येथून निघून जाणे पसंत केले. चोपडा तालुक्यात आज दुसऱ्या दिवशी चांगले आणि व्यवस्थित दौरे झाले आहेत. कुठेच गोंधळ झालेला नाही. - खासदार रक्षा खडसे.