रावेर : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थिती दिल्याचे कारण
रावेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत उपस्थिती दिल्याच्या कारणावरून सावदा येथील भाजपच्या नगराध्यक्षा आणि नऊ नगरसेवकांना भाजपने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावदा शहर आढावा बैठकीत नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांच्यासह नऊ नगरसेवकांनी उपस्थिती दिली होती. यावर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. सन २०१६ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अनिता पंकज येवले व १० नगरसेवक भाजपाकडून निवडून आले होते. त्यातील एक नगरसेविका वगळता बाकी सर्व राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर उपस्थित होते. याची भारतीय जनता पक्षाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.