शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप जळगाव जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:45 IST

अमळनेर घटनेचे पडसाद

जळगाव : अमळनेरात पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्यावर जलसंपदा मंत्र्यांच्या समोर व्यासपीठावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकाराची पक्ष पातळीवरून गंभीर दखल घेतली जाण्याचे संकेत आहेत. तर दुसरीकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे पद अडचणीत आले असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राज्यस्तरीय नेत्यांनी घटनेची माहितीही घेतली आहे.भाजप अंतर्गत कलहाचे पडसाद बुधवारी अमळनेरात भाजपच्या मेळाव्यात उमटले. पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करून उदय वाघ व त्यांच्या समर्थकांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर डॉ. बी.एस. पाटील यांना लाथाबुक्क्याने तुडवले. याबाबतचे चित्रण सोशल मिडियावर काल व आजही दिवसभर फिरत होते.घटनेची केली जातेय चौकशीभारतीय जनता पक्ष पातळीवर अमळनेच्या घटनेची बुधवारी सायंकाळी व गुरूवारी विविध पातळ्यांवर माहिती घेतली जात आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून माहिती घेतल्याचे समजते. तर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी सह संघटन मंत्री अ‍ॅड. किशोर काळकर यांच्याकडे चौकशी करून माहिती घेतल्याचे वृत्त आहे. मतदान प्रक्रिया संपताच वाघ यांची गच्छती केली जाण्याचे संकेत आहेत. वाघ यांच्या जागी यापूर्वी अध्यक्षपदाची धुरा जि.प. चे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर किंवा जामनेरचे गोविंद अग्रवाल यांना संधी दिली जाण्याचेही बोलले जात आहे.डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्री येणारअमळनेरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमळनेरात १८ किंवा १९ एप्रिल रोजी सभा घेण्याचे भाजप पक्ष पातळीवर नियोजन सुरू झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.दोन टर्म अध्यक्षपदभाजप जिल्हाध्यक्षपदाचा आढावा घेता १९८० ते २०१९ या कालावधीत सर्वाधिक काळ जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी चाळीसगावच्या अ‍ॅड. शिवाजीराव पालवे यांच्याकडे होती. ते १९८४ ते १९९१ या काळात सलग सात वर्षे अध्यक्ष होते. त्या खालोखाल २०१३ ते २०१९ असे सलग सहा वर्षे म्हणजे दोन टर्म अध्यक्षपदाची संधी उदय वाघ यांना मिळाली आहे. जानेवारीत पक्षांतर्गत निवडणुकांच्या हालचाली होत्या मात्र निवडणुकांमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव