शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

फुटलेल्या २७ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी भाजपकडून याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत फुटलेल्या २७ नगरसेवकांना धडा शिकवण्यासाठी भाजपने तयारी केली असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत फुटलेल्या २७ नगरसेवकांना धडा शिकवण्यासाठी भाजपने तयारी केली असून, पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत या सर्व नगरसेवकांना अपात्र ठरवावे, यासाठी बुधवारी नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे अपिल दाखल करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे गटनेते भगत बालाणी, नाशिक महापालिकेचे गटनेते जगदीश पाटील व ॲड. संदीप भगत आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या १८ मार्च रोजी झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी भाजपमध्ये उभी फूट पडून भाजपच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेशी हातमिळवणी केल्याने भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार प्रतिभा कापसे व उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे विजयी झाले होते. भाजपच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षादेश न जुमानता पक्षाशी गद्दारी केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, याकरिता जळगाव मनपातील भाजपचे गटनेता भगत बालाणी यांनी बुधवारी दुपारी १ वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी घेतला दोन आठवड्यांचा वेळ

शिवसेनेच्या गोटात सहभागी झाल्यानंतर या नगरसेवकांना भाजपने प्रत्यक्ष, मोबाईल, व्हाॅट्सॲप, वृत्तपत्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून सहा प्रकारे पक्षादेश बजावला होता. मात्र, त्याचे उल्लंघन केल्याचा भाजपचा आरोप आहे. भाजपने फुटलेल्या सत्तावीस नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी पुरेसा वेळ घेतला असून, काही महत्त्वाचे कागदपत्रं जमा करण्यासाठी भाजपने स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, ॲड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी व जितेंद्र मराठे या चार नगरसेवकांना कामाला लावले होते. महापालिकेसह इतर ठिकाणाहून काही कागदपत्रे भाजपने जमा केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीदरम्यान ऑनलाईन महासभेत नगरसेवक व मनपाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य काहीजण सहभागी झाल्यामुळे ही महासभा बेकायदेशीर असल्याबाबतही न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी भाजपने केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.