शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या फलकावरून मुख्यमंत्री गायब; ट्रोल झाल्यावर केली दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 13:02 IST

जिल्हा बॅँकेच्या कर्जमुक्तीचे फलक सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तर्कवितर्कांना आले उधाण

जळगाव : जिल्हा बँकेची कर्जफेड मनपाने बुधवारी केली. बऱ्याच वषार्नंतर मनपा कर्जमुक्त झाल्याने त्या विषयीचे ‘आश्वासन पूर्तीकडे’... या विषयी तयार करण्यात आलेल्या फलकावर भाजपाच्या सर्व नेत्यांचे छायाचित्र असताना केवळ मुख्यमंत्र्यांचेच छायाचित्र नसल्याने त्या विषयी तर्कवितर्क लावून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान, हा फलक तयार करणाºयाकडून ते नजरचुकीने झाले असून त्यात दुरुस्ती करण्यात आल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी म्हटले आहे.जिल्हा बँकेचे कर्जफेडी चे श्रेय घेण्याच्या घाईत मनपा भाजप गटाने फलक तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यात निवडणुकीत कर्जमुक्त मनपाचे आम्ही आश्वासन दिले होते, त्या आश्वासनपूर्तीकडे पहिले पाऊल व हुडकोच्या कजार्तूनही लवकरच कर्जमुक्त होऊ असा आशय आहे. या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्यासह विविध नेते, पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र आहेत. त्यानंतर खाली आभार म्हणून महापौरांसह मनपाच्या पदाधिकाºयांचे फोटो आहेत.सर्व नेत्यांचे छायाचित्र असताना व हुडकोचेही कर्ज लवकरच फेडू, असा विश्वास व्यक्त होत असताना तेथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच छायाचित्र नसल्याचे हा फलक दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुख्यमंत्र्यांची रद्द झालेली महाजनादेश यात्रा, माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेली मुख्यमंत्रीपदाची इच्छा, एकनाथराव खडसे यांनी या इच्छेवरून स्वत: चा दिलेला दाखला या पार्श्वभूमीवर हे फलक चर्चेत आले. भाजपचा मनपा गट ट्रोल झाल्याने संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असल्याचे याच आशयाचे फलक सोशल मीडियावर फिरु लागले.फलक तयार करणाºयाकडून ही चूक झाली आहे. कोणत्या फलकावर मुख्यमंत्र्यांचा फोटो घ्यायचा हे त्याच्या लक्षात न आल्याने त्याच्याकडून ही चूक झाली. मात्र नंतर लक्षात येताच त्यात सुधारणा करण्यात आली.-सुरेश भोळ, आमदार

टॅग्स :Jalgaonजळगाव