शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावकरांना भाजपकडून पुन्हा ‘गाजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:20 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : गेल्या वर्षी मनपा निवडणुकीपूर्वी ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा ...

विजयकुमार सैतवालजळगाव : गेल्या वर्षी मनपा निवडणुकीपूर्वी ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी आणून शहराचा चेहरा मोहरा बदलवू असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी शहराचा चेहरा-मोहरा काही बदलेला नाही. आता पुन्हा आमदार सुरेश भोळे यांनी पुन्हा आकड्यांचा खेळ दाखवित वर्षभरात शहराचा चेहरा बदलविण्याचे गाजर दाखविले आहे.‘जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण?’ या विषयावरील चर्चासत्राच्या दुसऱ्या भागाचे आयोजन शनिवार ३ रोजी दुपारी मायादेवी नगरातील रोटरी भवनात करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शहरवासीयांनी मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत शहरवासीयांच्या त्रासाचे खापर मनपावर फोडले. या सोबतच वाहतूक शाखेच्या कारभारामुळे अपघात होत असल्याचाही आरोप करण्यात आला.गेल्या वर्षी मनपा निवडणुकीपूर्वी ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता असल्याने वर्षभरात शासनाकडून मनपाला १०० कोटी रुपयांचा निधी आणून शहराचा चेहरा मोहरा बदलवू असे आश्वासन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र वर्ष उलटले तरी शहराचा चेहरा-मोहरा काही बदलेला नाही. आमदार सुरेश भोळे यांनी शनिवारी झालेल्या चर्चासत्रात शहरातील विकास कामांसाठी मिळालेल्या विविध योजनांच्या माध्यमातून ८९१ कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिली. त्याच वेळी त्यांनी या विकास कामांची कालमर्यादा सांगत वर्षभरात सर्व कामे मार्गी लागून शहराचा चेहरामोहरा बदललेला असेल आश्वासन दिले. असे असले तरी गेल्या वर्षभरात अमृत योजना, रस्त्यांवरील खड्डे, अतिक्रमण,साफसफाईचा ठेका,हुडकोकर्ज,गाळेप्रश्न असे अनेक प्रश्न कायम आहे. त्यामुळे आताही या आश्वासनावर कसा विश्वास ठेवावा, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. अमृत योजनेचे काम झाल्यानंतर शहरात भूमीगत गटारींचे काम होऊन त्यानंतर रस्त्यांचे कामे होतील. यात भूमीगत गटारींच्या कामाचे भूमीपूजन आठ दिवसात होईल, असे आमदार म्हणाले. स्वच्छ भारत योजनेंतर्गत ३० कोटींचा निधी मिळाला असून त्यात खरेदी केलेल्या घंटागाड्या आठ दिवसात सुरू होतील व १५ दिवसात शहरात कोठेच कचरा दिसणार नाही, असेही ते म्हणाले. या सोबतच वर्ष-दीड वर्षात शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, आठवडाभरात पोलीस निवासस्थानांचे भूमीपूजन करण्यासह एलईडी दिव्यांच्या समस्या पाहता मक्तेदारच बदलविणार असल्याचे ते म्हणाले. शहराचे सिंगापूर होईल असे नाही, मात्र येथील प्राथमिक गरजा तरी पूर्ण करू, असेही त्यांनी सांगितले. आमदार भोळे यांनी चर्चासत्रात अमृत योजना, भूमीगत गटारी, समांतर रस्ते व इतर कामांसाठी आणलेल्या निधीची आकडेवारी सांगितली. त्यावर आक्षेप घेत तफावत असल्याचा मुद्दा मांडला असता त्यावर प्रिंट मिस्टेक असल्याचे आमदार भोळे म्हणाले. ही सर्व आकडेवारी आपल्याकडे पुराव्यानिशी असून ती खोटी असल्यास आपण केव्हाही राजीनामा देण्यास तयार आहोत, असे आव्हानही आमदारांनी दिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव