शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : ‘जळगाव शहर’च्या जागेवर भाजप आणि सेनेचाही दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 13:01 IST

चुडामण बोरसे जळगाव - विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली. आता जळगाव शहर मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवाराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

चुडामण बोरसेजळगाव- विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली. आता जळगाव शहर मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवाराबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगण्याची शक्यता आहे.जळगाव शहर मतदार संघ हा युतीमधील शिवसेनेकडे आहे. गेल्या वर्षी युती तुटली आणि भाजपकडून सुरेश भोळे आणि शिवसेनेकडून सुरेशदादा जैन हे रिंगणात होते. यात भोळे यांनी बाजी मारली. आता पुन्हा ते या निवडणुकीसाठी शड्डू ठोकून उभे आहेत. दुसरीकडे युती होईल अथवा नाही, युती झाल्यास हा मतदार संघ कुणाला सुटणार? याविषयी याचीही चर्चा सुरु झाली आहे.युती न झाल्यास भाजपतर्फे भोळे यांना संधी मिळू शकते तर शिवसेनेतर्फे माजी महापौैर विष्णू भंगाळे अथवा नगरसेवक सुनील महाजन यांची नावे चर्चेत आहेत. युती झाल्यास शिवसेना ही जागा सहजासहजी सोडेल, असे वाटत नाही. कारण सेनेचा हा पारंपारिक मतदार संघ आहे.दुसरीकडे गेल्या काही दिवसापूर्वी ज्या ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले आहेत, त्या जागा भाजपकडे कायम राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यामुळे भोळे यांना एक प्रकारे दिलासाच मिळाला आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जळगावात आली होती. त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भोळे यांना उद्देशून मामा तुम्ही तिकिटाची चिंता करु नका.. तिकिट मामींनाही मिळू शकते, असे सांगून टाकले होते.दुसरीकडे काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीतही जळगाव शहराची जागा काँग्रेसकडे आहे. या पक्षाकडून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील तसेच महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांची नावे चर्चेत आहेत. कुणालाही किती जागा मिळाव्यात यावरुन या दोन्ही पक्षात वाद सुरु आहेत. समोरच्या पक्षाची ताकद कमी आहे... हे दोन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष सांगू लागले आहेत. त्यावरुन पक्षाच्या ताकदीची कल्पना येते.मागील पंचवार्षिक निवडणुकीत वेळी मनसेचे इंजिनही जोरात होते. मनसेचे ताकद आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. कारण त्यावेळी मनसेत असलेले ललित कोल्हे हे आता भाजपमध्ये तर त्यांचे सहकारी अनंत जोशी हे शिवसेनेत आहेत.याशिवाय आप, वंचित आघाडीही तयारीत आहेत. पण त्यांची ताकद मर्यादीत आहे. त्यामुळे लढत झाल्यास भाजप- शिवसेना अशी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.शिवसेनेतर्फे विष्णू भंगाळे यांनी मुलाखत दिली आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास एकाच कुटुंबातील दोन सदस्य आमने- सामने असतील. या लढतीसाठी भंगाळे यांना घरातून होकार देण्यात आल्याची माहिती मिळाली. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव