शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात पक्षी देतात वेगवेगळे संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:20 IST

संकलन : बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था पहिला पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. त्यातही पर्यावरणप्रेमींना पावसाळ्यासारखा ऋतू विशेष खुणावत असतो. ...

संकलन : बाळकृष्ण देवरे, वन्यजीव संरक्षण संस्था

पहिला पाऊस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. त्यातही पर्यावरणप्रेमींना पावसाळ्यासारखा ऋतू विशेष खुणावत असतो. भीषण उन्हाळ्यात शुष्क झालेले रान हिरवळीने नटू लागते. वर्षभर मूक राहणाऱ्या पावशा पक्ष्याची शीळ आसमंतात घुमू लागली की, शेतकरी पेरणीच्या तयारीला लागतात. पावशाची शीळ म्हणजे शेतकऱ्यांना ‘पेरते व्हा ... पेरते व्हा’ असा संदेशच जणू.

काही प्राण्यांचा जीवनक्रम पावसाळ्यापुरता असतो, काही इतर ऋतूत सुप्तावस्थेत जातात, तर काही पावसाळ्यात जास्त सक्रिय होतात.

पावसाळ्यात बेडूक बाहेर निघतात. त्याचबरोबर, काही प्राणी, पक्षी, कीटक, सरीसृपही पावसाळ्यात दृष्टीस पडतात. त्यापैकी काही आपल्या

परिचित आहेत, तर काही अनोळखी. काहींना बघून भीती वाटते, कुणाच्या बद्दल गैरसमज आहे, तर कुणाला बघून मन प्रसन्न होते. काही प्राण्यांबद्दल ही उद्‌बोधक माहिती.

वाळा साप

- पावसाळ्यात बहुतेक प्रत्येकाच्या घरात किचन ,बाथरूमच्या जवळपास दिसणारा पेनाच्या रिफिलसारखा अतिशय चपळ आणि चमकदार दिसणारा हा पूर्ण वाढ झालेला साप बहुतेक सर्वांनाच सापाचे पिलू वाटते. अतिशय निरुपद्रवी असलेला हा साप नेहमीच मारला जातो.

वाळा साप शास्त्रीय नाव: Ramphotyphlops braminus. हा आशिया व आफ्रिकेत सापडणारा छोट्या आकारमानाचा आंधळा, बिनविषारी साप आहे. अतिशय निरुपद्रवी असा हा साप दिसायला गांडुळासारखा असल्याने बरेचदा लोक गल्लत करतात, पण त्याच्या अंगावर गांडुळासारखी वलये नसतात. कडक जमिनीवर नागमोडी आकारात सरपटताना कधी-कधी दिसतो. ओल्या जमिनीतील अळ्या, किडे हे याचे अन्न आहे. वाळा साप लालसर तपकिरी रंगाचा असून, याचा पोटाकडचा भाग फिका असतो. याच्या सडपातळ गोलाकार शरीरावर जवळजवळ असणारे खवले दिसतात.

घोरपड

(इंग्लिश: Bengal monitor, बेंगाल मॉनिटर) : हा दक्षिण आशियात आढळणारा मॉनिटर सरड्याचा एक विशाल प्रकार आहे. पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. घोरपडीला इंग्रजीत ‘मॉनिटर लिझार्ड’ असेच म्हणतात.

विंचू

(इंग्रजी: scorpion): एक विषारी प्राणी. याने मनुष्यास दंश केला असता, शरीराची आग होते. भारतात सुमारे १२० प्रकारचे विंचू आढळतात. त्यापैकी सर्वात मोठा विंचू हा १८ ते २० सेंटिमीटर लांबीचा असतो. ऑर्थोकायरस बस्तवडेई प्रजातीत विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश आहे. यात महाराष्ट्रात दोन जाती आहेत. महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात, काळा आणि लाल विंचू. काळा विंचू आकाराने मोठा असतो, परंतु हा कमी घातक असतो. लाल विंचू मुख्यत:कोकणात सापडणारा आहे. हा जास्त घातक आहे.

गोम :

हा प्राणी संधिपाद आहे. जगातील सगळ्या उष्ण आणि समशितोष्ण प्रदेशांत हा आढळतो. बहुतेक गोमा भूचर असून दिवसा जमीन, दगडधोंडे किंवा

पालापाचोळ्यांच्या खाली, खडकाच्या भेगांत किंवा घरामध्ये काळोखी तळघर व स्नानगृह अशा ठिकाणी दमट ठिकाणच्या कोपर्‍यात राहतात. रात्री त्या भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतात. गोमेच्या दंशामुळे ताप, चक्कर व डोकेदुखी उद्भवते. घरात आढळणारी व पायांच्या १५ जोड्या असणारी गोम विषारी नाही, उलट घरातील झुरळे, डास, कसर व ढेकूण यांसारख्या उपद्रवी कीटकांना खाऊन गोम माणसासाठी उपकारकच ठरते.

मृगाचा किडा :

पहिल्या पावसाच्या सरींनंतर वर्षभर सुप्तावस्थेत असलेला मखमली असा ‘मृगाचा किडा’ सध्या दिसू लागला आहे. ... रंगाने लाल व अंगावर मखमल पांघरलेला व पहिल्याच पावसाच्या दिवसांत दिसणारा हा किडा ‘मृगाचा किडा’ म्हणून ओळखला जातो.

सिकाडा :

रात्रीच्या वेळी जंगलात जो ‘किर्र’ आवाज येतो, तो याच प्रजातीच्या किड्यांमुळे. संपूर्ण जगात या किड्यांच्या ३,००० प्रजाती आढळून येतात. एकट्या

भारतात त्याच्या १५० प्रजाती आहेत. यातील सिकडा हा प्रामुख्याने पावसाळ्यात आढळतो. हा किडा सहसा डोळ्यांनी बघणं कठीण आहे. कारण झाडांच्या रंगाशी तो मिसळून गेलेला असतो.

पावश्या पक्षी :

ब्रिटिश राजवटीत या पक्ष्याला ‘ब्रेनफीव्हर बर्ड’ हे नाव देण्यात आले आणि तेच पुढे रूढ झाले. उत्तर भारतात याला ‘पपीहा’ म्हणतात. महाराष्ट्रात त्याला पावश्या म्हणतात. कारण त्याचे आणि शेतकऱ्यांचे जवळचे नाते आहे.

नवरंग पक्षी :

हा पक्षी भारतभर सर्वत्र दिसतो. तो भारतातील सर्व वनांत आणि झुडपी वनांत आढळतो व त्याच्या विणीच्या काळात म्हणजे, मे ते ऑगस्ट या काळात दिसतो. पक्ष्यातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. त्यांच्यात निळा, हिरवा, काळा, पांढरा, तांबडा हे भडक रंग प्रामुख्याने दिसतात. हा पक्षी आकारमानाने मैनेएवढा असून, भुंड्या शेपटीचा आहे. त्याचा पोटाखालचा व शेपटीखालचा रंग किरमिजी असतो. नवरंग पक्षी उडताना पंखांच्या टोकावर ठळक पांढरे ठिपके दिसतात.