जळगाव : शहरातील आहुजा नगरजवळील हॉटेलजवळ रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास दुचाकीला (एमएच१९ एआर ७१७५) अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सोनुसिंग धनसिंग पारधी(२६)रा.सावदा या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दीपक मणीलाल पारधी (२३) हा जखमी झाला आहे. सोनुसिंग व दीपक हे दोघे सावदा येथील खदाणीमध्ये काम करतात. मशीनचे पाते घेण्यासाठी ते जळगाव शहरात आले होते. दरम्यान घरी परतत असताना रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात सोनुसिंग जागीच ठार झाला. पोलिसांनी सोनुसिंगला मयत तर दीपकला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात आक्रोश दोघांचेही नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. सोनुसिंगच्या निधनाबाबत कळताच त्यांनी आक्रोश केला. दीपकवर वार्ड क्रमांक सातमध्ये उपचार सुरू आहेत. सोनुसिंग याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. |
दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: January 29, 2015 15:00 IST