शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
4
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
5
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
6
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
7
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
10
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
11
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
12
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
13
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
14
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
15
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
16
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
17
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
18
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
19
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
20
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

जळगावात उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; उन्मेष पाटलांच्या प्रवेशानंतर नव्या चेहऱ्याला लोकसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 14:02 IST

Jalgaon Lok Sabha: उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता.

Uddhav Thackeray ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली असून चार नव्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये  कल्याण डोंबिवलीतून वैशाली दरेकर, हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील, पालघरमधून भारती कामिड आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पवार यांना संधी देण्यात आली आहे. जळगावचे विद्यमान भाजप खासदार यांनी आजच आपल्या खासदारकीचा राजीनामा देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काही क्षणांतच उद्धव ठाकरेंनी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.

भाजपने तिकीट वाटपात डावलल्यानंतर उन्मेष पाटील हे पक्षावर नाराज होते. जळगावात भाजपने पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी दिली. या पार्श्वभूमीवर काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर जात शिवबंधन हाती बांधलं. पाटील यांच्यासोबत पारोळ्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांनीही उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला. उन्मेष पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र पाटील यांच्या सहमतीनेच उद्धव ठाकरे यांनी करण पवार यांना आज उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत करण पवार?

करण पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पवार यांनी भाजपकडून एरंडोल विधानसभेसाठी तयारीही सुरू केली होती. परंतु भाजप आणि शिवसेनेची युती झाल्याने पवार यांची उमेदवारी डावलली गेली. करण पवार हे पारोळ्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राहिले असून त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. शिवसेनेतील बंडानंतर जळगावातील बहुतांश नेते शिंदेंच्या शिवसेनेत गेले असले तरी, कार्यकर्ते मात्र मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बाजूने आहेत. त्यामुळे उन्मेष पाटील व करण पवार यांच्या पक्षप्रवेशानंतर चाळीसगाव, पारोळा व एरंडोल या तीन तालुक्यांमध्ये उद्धवसेना मजबूत होणार आहे. शिवाय पाचोरा, भडगाव, तसेच जळगाव शहर व तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटन अजूनही चांगले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :jalgaon-pcजळगावUddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv Senaशिवसेना