शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावसह १८ जिल्ह्यातील बडे कर्जदार व एजंट रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST

जळगाव : बीएचआर प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव, धुळे, औरंगाबाद व अकोला या चार जिल्ह्यात कारवाईचा फास आवळल्यानंतर ...

जळगाव : बीएचआर प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव, धुळे, औरंगाबाद व अकोला या चार जिल्ह्यात कारवाईचा फास आवळल्यानंतर पुढचा मोर्चा राज्यातील इतर १८ जिल्ह्यांतील बडे कर्जदार, कमी किमतीत जागा खरेदी करणारे व सेटलमेंट करणाऱ्या एजंट यांच्याकडे वळविला जाणार असून, ही सर्व मंडळी आता रडारवर आलेली आहे. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भेट घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएचआरच्या संचालक मंडळाविरूध्द राज्यातील २२ जिल्ह्यातील ८१ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणी संस्थेच्या शाखा आहेत. तेथेही नियम डावलून कर्ज देण्यात आले होते, तर अवसायकाच्या काळात लिलाव दाखवून कमी किमतीत जागा खरेदी - विक्रीचा व्यवहार झालेला आहे. नंतर बड्या कर्जदारांचे कर्ज फेडण्यासाठी जळगावप्रमाणेच ठेवीदारांच्या पावत्या २० ते ३० टक्क्यात खरेदी करून त्या कर्जात समायोजित करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी एजंटांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या जिल्ह्यातील कर्जदार, ठेवीदार व समायोजित कर्ज प्रकरणांची पडताळणी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जात आहे. जसे जसे पुरावे हाती लागतील, तशी एकाच वेळी अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. नाशिक, बुलडाणा, अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद, पुणे व परभणी येथे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. इतर ठिकाणी एक ते तीन गुन्हे दाखल आहेत.

लहान कर्जदारांना जप्ती व वाॅरंटचा धाक

अवसायक जितेंद्र कंडारेचा एक हस्तक हा लहान कर्जदारांना न्यायालयीन कारवाई व संस्थेकडून जप्तीच्या कारवाईचा धाक दाखवून या थकीत कर्जदारांकडून लाखो रुपयांची वसुली करीत होता. या हस्तकाला कंडारेकडून थकीत कर्जदाराची यादी मिळायची, त्यानुसार हा थेट कर्जदारांना जाऊन भेटायचा. तुमच्याकडे अमूक रकमेचे कर्ज थकीत आहे. तुमच्याविरुध्द न्यायालयाचे वारंट निघू शकते किंवा तुमची मालमत्ता जप्त होऊ शकते. ही कारवाई टाळायची असल्यास विशिष्ट रक्कम भरावी लागेल, असे त्याच्याकडून सांगितले जायचे. हप्त्यापोटी भरावयाच्या थकीत रकमेचा आकडा मोठा असल्याने त्यात काही तरी कमी करा किंवा त्यासाठी कर्जदाराकडून मुदत मागितली जात होती. या दोघांमध्ये मार्ग काढण्यासाठी हा हस्तक थेट लाचेची मागणी करायचा. तुम्ही इतकी रक्कम द्या, काही दिवस तुमच्याकडे कुणीच वसुलीला येणार नाही आणि आले तरी मी बघून घेईन, असे सांगून काही रक्कम त्या कर्जदाराकडून घेतली जायची, असेही आता सांगितले जात आहे.