शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

भुसावळच्या अमृत योजनेला मिळणार नवसंजीवनी -पालकमंत्री गुलाबराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 02:11 IST

भुसावळच्या अमृत योजनेला नवसंजीवनी मिळणार आहे.

भुसावळ : शहरातील सध्या अडगळीत पडलेल्या तसेच मुदत संपूनही पूर्णत्वाला न आलेल्या अमृत योजनेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने नवसंजीवनी मिळणार आहे. मूळ ९० कोटींच्या या योजनेच्या १५८ कोटी रुपयांच्या नवीन सुधारित आराखड्याला मंजुरी देणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत दिली. यामुळे शहराच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होणार आहे.भुसावळ शहरात अमृत योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य असून नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठादेखील करण्यात येत नाही. या समस्येची गंभीर दखल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली आहे. या अनुषंगाने त्यांनी सोमवारी जळगाव येथे अजिंठा शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. यात या योजनेच्या कार्यान्वयबाबत सविस्तर उहापोह करण्यात आला.भुसावळ शहरात २२ मे २०१७ रोजी ९० कोटी ८४ लाख ५१ हजार रूपयांच्या अमृत योजनेला मान्यता देण्यात आली. यानंतर २६ ऑक्टोबर २०१७ रोजी मे. जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड, जळगाव या कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. या योजनेची मुदत दोन वर्षांची असली तरी मुदत संपून एक वर्ष उलटले तरी अद्याप याचे काम पूर्णत्वाकडे आलेले नाही. यात योजनेतील २१३ किलोमीटरपैकी १४० किलोमीटरच्या पाईपलाईनचे काम झालेले आहे, तर पाण्याच्या ११ टाक्यांपैकी ९ टाक्यांचे काम सुरू झालेले आहे.शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असले तरी कोविड-१९चा प्रादूर्भाव आणि नंतर पावसाळ्यामुळे वितरण व्यवस्था व रस्त्यांची कामे खोळंबली आहेत. याआधी पाण्याचा स्त्रोत हा शहरातील तापी नदीच्या पात्रात होता. हा स्त्रोत बदलून शेळगाव बंधार्‍याच्या वरील भागात साकेगाव शिवारात घेण्यात आला असून यासाठी मजिप्रा नाशिक येथे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.या पार्श्‍वभूमिवर, आजच्या बैठकीत मजिप्रातर्फे ९० कोटीऐवजी सुधारित १५८ कोटी रूपयांचा नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अमृतच्या मूळ योजनेचे काम येत्या मार्चअखेरीस पूर्णत्वाकडे येऊन नंतर सुधारित कामास प्रारंभ करण्यात येईल, असे या बैठकीत ठरविण्यात आले. यात जानेवारी २०२१ पर्यंत वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण करावे आणि ८ जलकुंभ हे मार्च २०२१ तर तीन जलकुंभ हे जुलै २०२१ अखेरीस पूर्ण करावे, असे निर्देश जैन इरिगेशनला या बैठकीत देण्यात आले. परिणामी अमृत योजनेला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठबळाने व आमदार संजय सावकारे यांच्या पुढाकाराने नवसंजीवनी मिळणार आहे.या बैठकीला आमदार संजय सावकारे, आमदार अनिल भाईदास पाटील, नगरसेवक मनोज बियाणी, मजिप्राचे अभियंता निकम, भुसावळचे मुख्याधिकारी संदीप चंद्रवार, प्रकल्प अभियंता वाघ, जैन इरिगेशनचे अधिकारी भिरूड आणि ललवाणी आदी उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीBhusawalभुसावळ