शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-कसारा रेल्वे ब्लॉकमुळे भुसावळ-मुंबई पॅसेंजर दोन दिवस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 16:31 IST

मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाऊन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान १९ रोजी साडेतीन तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे १८ व १९ मे रोजी मुंबई-भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१९ रोजी कल्याण-कसारा येथे साडेतीन तासांचा रेल्वे ब्लॉकभुसावळ-मुंबई पॅसेंजर १८ व १९ रोजी रद्दअनेक गाड्यांच्या मार्गात बदल

भुसावळ, जि.जळगाव : मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाऊन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान १९ रोजी साडेतीन तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे १८ व १९ मे रोजी मुंबई-भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली असून, या मार्गावरील अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.कसारा व कल्याण डाऊन मार्गावर १९ रोजी सकाळी ११.१५ ते २.४५ (साडेतीन तास ) विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे .ब्लॉकचा परिणाम अनेक गाड्यांवर होणार आहे. यामुळे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून, काही गाड्या रद्दही करण्यात आलेल्या आहेत.मार्ग बदलण्यात येणारी गाडी-११०२६ पुणे-भुसावल एक्सप्रेस १९ रोजी पनवेल, कल्याणऐवजी दौंड, मनमाडवरून येणार आहे.सुरुवातीच्या स्थानकावरुन १९ रोजी उशिरा सुटणाऱ्या गाड्या-११०६१ एलटीटी -मुझफ्परपूर एक्सप्रेस १२.१५ ऐवजी १३.३० वाजता सुटणार आहे.१२८६९ मुंबइ- हावडा एक्सप्रेस ११.०५ ऐवजी १५.०० वाजता सुटणार आहे.११०५५ एलटीटी- गोरखपूर एक्सप्रेस १०.५५ ऐवजी १४.३० वाजता सुटणार आहे.१२५४२ एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस ११.१० ऐवजी १५.०० वाजता सुटणार आहे.०२०२१ मुंबई-नागपूर हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस ११.३० ऐवजी १५.३५ वाजता सुटणार आहे.११०७१ एलटीटी- वाराणसी एक्सप्रेस १२.४० ऐवजी १४.१० वाजता सुटणार आहे.१२१८८ मुंबई- जबलपूर एक्सप्रेस १३.३० ऐवजी १३.४५ वाजता सुटणार आहे.०४११६ मुंबई-अलाहाबाद हॉलिडे स्पेशल एक्सप्रेस १६.४० ऐवजी २० मे रोजी ००.२० वाजता सुटणार आहे.१२०७२ जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस जालन्या वरुण सकाळी ०४.४५ ऐवजी ०७.४५ वाजता सुटणार आहे.शॉर्ट टर्मिनेशन१२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस नागपूर वरुण १८ रोजी सुटणारी ही गाडी नागपूर ते नाशिकपर्यंतच जाणार आहे.१२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस १९ ला मुंबईऐवजी नाशिक ते नागपूरपर्यंत धावेल.११०९४ वाराणसी-मुंबई महानगरी एक्सप्रेस वाराणसीवरुन १८ला सुटणारी वाराणसी ते दादर चालवण्यात येणार आहे.रद्द गाड्याट्रेन क्रमांक ५११५४ भुसावळ-मुंबई पैसेंजर १८ रोजी रद्द करण्यात आली आहे.ट्रेन क्रमांक ५११५३ मुंबई-भुसावळ पॅसेंजर १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.ट्रेन क्रमांक १२११८ मनमाड-एल.टी.टी. गोदावरी एक्सप्रेस १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.ट्रेन क्रमांक १२११७ एल.टी.टी.- मनमाड गोदावरी एक्सप्रेस १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.ट्रेन क्रमांक २२१०२ मनमाड-मुंबई राज्य रानी एक्सप्रेस १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.ट्रेन क्रमांक २२१०१ मुंबई-मनमाड राज्य रानी एक्सप्रेस १९ रोजी रद्द करण्यात आली आहे.या ब्लॉक कालावधी दरम्यान १२८१२ एल टी टी स्थानकावर १३.४५ ऐवजी १६.१५ वाजता पोहोचेल११०९४ मुंबई ऐवजी दादर स्थानकावर १४.१५ ऐवजी १६.३०वाजता पोहचणार आहे.१२२९४ एलटीटी स्थानकावर १४.५५ ऐवजी १६.३० वाजता पोहचणार आहे.१२१४२ एलटीटी स्थानकावर १५.१५ ऐवजी १७.१० वाजता पोहचेल. ११०८० एलटीटी स्थानकावर १६.०० ऐवजी १७.३० वाजता पोहचेल.११०६० एलटीटी स्थानकावर १६.१५ ऐवजी १७:४५ वाजता, १२१६८ एलटीटी स्थानकावर १२.२५ ऐवजी १६.०० वाजता पोहचेल.दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून ब्लॉक, तांत्रिक, तिसरी लाइन अशा अनेक कारणांमुळे पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचे पूर्णता नियोजन कोलमडले असून, वेळेवर गाड्या रद्द झाल्या आहेत. यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीBhusawalभुसावळ