आॅनलाईन लोकमतभुसावळ, जि. जळगाव, दि. ८ - भुसावळ शहरातील मोहम्मदी नगरात कौटुंबिक कारणावरून सख्ख्या भावानेच चाकूचे सपासप वार करून भावाची हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.भावानेच संपवले भावालाशहरातील मोहम्मदी नगरातील रहिवासी असलेल्या व गवंडी काम करणाºया जावेदअली गुलामअली (29) यांची लहान भाऊ व व्यवसायाने रिक्षा चालक असलेल्या वाहेदअली गुलामअली (27) याने चाकूचे निर्र्घूण वार करून हत्या केली. तत्पूर्वी गंभीर जखमी अवस्थेतील जावेदअली यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघा भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संपत्तीचे तसेच अन्य काही वाद सुरू होते. गुरुवारी पुन्हा भांडण होवून वाद विकोपाला गेल्याने वाहेदअलीने भावाला चाकू मारला असावा, अशी शक्यता आहे. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पाहणी केली.
भुसावळ येथे भावानेच केला भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 13:18 IST
आरोपीला अटक
भुसावळ येथे भावानेच केला भावाचा खून
ठळक मुद्देकौटुंबिक कारणावरून चाकूने केली हत्याभावानेच संपवले भावाला