शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हे टाळण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 16:09 IST

संगणक, स्मार्ट फोन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून होणारे संभाव्य सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रवाशांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पो.नि. दिलीप गढरी यांनी केले.

ठळक मुद्देकोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ई- मेलवर क्लिक करु नकाबँकेविषयीची कोणतीच माहिती कोणालाही दूरध्वनी व मोबाईलवर देऊ नकाएटीएम कार्डचा वापर करताना एटीएम सेंटरची पाहणी करुन संशयास्पद आढळल्यास पुढील व्यवहार करणे टाळा एचटीपीएसने सुरुवात होणाऱ्या सुरक्षित संकेत स्थळाचाच वापर कराबँकेविषयीची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करू नकासायबर गुन्हा घडला असल्यास सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा

भुसावळ, जि.जळगाव : संगणक, स्मार्ट फोन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून होणारे संभाव्य सायबर गुन्हे टाळण्यासाठी प्रवाशांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्याचे पो.नि. दिलीप गढरी यांनी केले.महाराष्ट्र सायबर यांच्यावतीने जनजागृतीपर पत्रके वाटून प्रवाशांमध्ये जागृती करण्याचे काम केले जात असून, यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी ते पुढे म्हणाले की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या ई- मेलवर क्लिक करु नका. ई मेल पासवर्ड अ‍ॅटो सेव्ह करणे टाळा. ब्राऊजर अद्ययावत करा. संगणकावरील इस्टॉल प्रोग्रॉमकडे वेळोवेळी लक्ष ठेवा, अ‍ॅन्टी व्हायरसचा उपयोग करा. संगणकासाठी वैयक्तीक फायबर वॉल अद्ययावत करुन घ्यावा. मोबाईल स्मार्टफोनला पासवर्ड ठेवा. बँकेविषयीची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करू नका. अनोळखी व्यक्तीची मित्र रिक्वेस्ट स्वीकारु नका. अनोळखी व्यक्तीच्या लिंक्स उघडू नका. एचटीपीएसने सुरुवात होणाऱ्या सुरक्षित संकेत स्थळाचाच वापर करा. बँकेविषयीची कोणतीच माहिती कोणालाही दूरध्वनी व मोबाईलवर देऊ नका. एटीएम कार्डचा वापर करताना एटीएम सेंटरची पाहणी करुन संशयास्पद आढळल्यास पुढील व्यवहार करणे टाळा. सायबर गुन्हा घडला असल्यास सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही पो.नि.दिलीप गढरी यांनी यावेळी केले.याप्रसंगी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पो.नि.दिलीप गढरी व रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकातील मुसाफिर खान्यात सायबर गुन्हे रोखण्याबाबत प्रवाशांना जनजागृती पत्रके वाटून प्रचार व प्रसार केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ