शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या पुढाकाराने लक्षणे नसलेले ५१८ नागरिक ‘होम क्वारंटाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 19:05 IST

नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पुढाकार घेत तब्बल ५१८ कोरोना बाधित सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनसाठी यशस्वी पुढाकार घेतला आहे.

भुसावळ : शहरात कोरोना बाधित रुग्णांनी सव्वादोन हजारांचा आकडा पार केला आहे, अशात गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही, अत्यावश्यक रुग्णांना उपचार मिळावे व लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना होम क्वारंटाईनची परवानगी मिळावी व त्यांचा मानसिक त्रास कमी व्हावा या उद्देशातून नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पुढाकार घेत तब्बल ५१८ कोरोना बाधित सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईनसाठी यशस्वी पुढाकार घेतला आहे.परप्रांतीय नागरिकांसह लॉकडाऊन काळात सर्वांना घरपोच फुड पॅकेटची व्यवस्था असो की बाधित रुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्याचा विषय सर्व बाबतीत नेहमी अग्रेसर असलेले कोठारी यांनी सध्या सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना होम क्वारंटाईनसाठी परवानगी द्यावी याकरिता वैद्यकीय अधीक्षक डॉ.देवर्षी घोषाल, डॉ.विक्रम सोनार यांची भेट घेऊन भुसावळचा आकडा वाढता पाहता कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध असलेले बेड हे अति आवश्यक असलेल्या रुग्णांसाठी वापर करावा व ज्यांना सौम्य लक्षणे असतील त्यांना होम क्वारंटाईनसाठी परवानगी द्यावी या प्रस्तावाला होकार दिल्यानंतर कोठारी यांनी गेल्या काही दिवसात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रेल्वे हॉस्पिटल केअर सेंटरमधून ५१८ सौम्य लक्षणे असलेल्या बाधित रुग्णांना होम क्वारंटाईनसाठी परवानगी मिळवून दिलेली आहे. यासाठी त्यांना गजानन चव्हाण, तेजस आंबेकर, साई सेवा समिती सदस्यांचे सहकार्य लाभले आहे.शहरात सव्वादोन हजारावर कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी २५ टक्के रुग्ण हे ‘होम क्वारंटाईन’ आहेत. शासकीय कागदाची जुळवाजुळव करताना असताना कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदार दीपक धिवरे, संबंधित तलाठी, वैद्यकीय अधिकारी सर्वांचे त्यांना सहकार्य लाभले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ