शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ शहर महिनाभरात होणार खड्डेमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 22:30 IST

भुसावळ शहरातील रस्त्यांची गेल्या पाच ते सात वर्षांपासून वाट लागली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी दिले न.पा.ला आदेशआ.सावकारे व पालकमंत्री पाटील यांच्या प्रयत्नाला यश‘लोकमत’ने वारंवार केला पाठपुरावा

भुसावळ : शहरातील रस्त्यांची गेल्या पाच ते सात वर्षांपासून वाट लागली आहे. मुख्य रस्त्यांसह सर्वच रस्ते अक्षरश उदध््वस्त झाले आहेत. माजी नगराध्यक्षांसह विद्यमान नगराध्यक्ष रस्ते बनवण्यात अपयशी ठरले आहेत. ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यातच यासंदर्भात आवाज उचलला आहे, तर आमदार संजय सावकारे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन रस्त्यांच्या कामासंदर्भात विचारणा केली आहे. महिनाभरात रस्ते पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी नूतन मुख्याधिकाºयांना दिले आहेत. त्यामुळे महिनाभरात रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येणार असल्याचे माहिती मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.आमदार सावकारे यांनी शहरातील रस्त्यांसंदर्भात जिल्हाधिकारी राऊत व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पत्र देऊन नगरपालिकेत निधी शिल्लक असतानाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी केली. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार सावकारे व जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा केली. मुख्याधिकारी चिद्रवार यांना एका महिन्यात सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश दिले.२५ रोजी पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासन अधिकाºयांनी भुसावळातील रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल माहिती मागवली होती. त्यानुसार २९ रोजी पालकमंत्र्यांनी मुख्याधिकाºयांना निधी असूनही खड्डे का बुजवले जात नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर माजी मंत्री खडसे व आमदार सावकारे यांच्यासोबत पुन्हा चर्चा केली.पालकमंत्री पाटील यांचे पत्र आले आहे. त्यामुळे तातडीने कार्यवाही करून एका महिन्यात पूर्ण शहर ‘खड्डे मुक्त’ करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी चिद्रवार यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाBhusawalभुसावळ