शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

भुसावळ येथे वैयक्तिक वादातून भावानेच केला भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 13:39 IST

गंगाराम प्लॉट मधली घटना

भुसावळ, जि. जळगाव : वैयक्तिक कारणावरून दारूच्या नशेत सख्ख्या भावाचा खून करण्यात आल्याची घटना गंगाराम प्लॉट मध्ये शनिवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात बाजारपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.योगेश प्रल्हाद पाटील (वय ३२) रा. गंगाराम प्लॉट असे मयताचे नाव आहे . त्याच्या गळ्यावर , छातीवर व पोटाच्या एका बाजूला धारदार शस्त्राने वार करून जखमा करण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सकाळी पाचच्या वाजेच्या सुमारास गंभीर अवस्थेत घरात दिसून आला. त्यावेळी त्याला गोदावरी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले . मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात त्याचा भाऊ स्वप्निल प्रल्हाद पाटील ( वय 28 ) यास ताब्यात घेण्यात आले आहे . मयत योगेश याचा मृतदेह नगरपालिका रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल होऊ शकतो , असे सूत्रांकडून सांगण्यात आले . दरम्यान, घटनास्थळी डी. वाय.एस.पी. गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देविदास पवार व सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव