शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ आगारप्रमुखास एक हजारांची लाच घेताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 19:03 IST

चौकशी अहवाल अनुकूल द्यावा यासाठी एक हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील एसटी आगाराचे आगारप्रमुख हरीश मुरलीधर भोई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

ठळक मुद्देजळगावच्या लाचलुचपत विभागाने भुसावळात रात्री दहाला केली कारवाईअवघ्या दोन वर्षातच ‘भोई’ अडकले ‘जाळ्यात’एसटीतील आगारप्रमुखाची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यावर पहिलीच होती भुसावळातील नियुक्तीचार दिवस पोलीस कोठडीमहिला कर्मचाऱ्यालाही दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार

भुसावळ, जि.जळगाव : चौकशी अहवाल अनुकूल द्यावा यासाठी एक हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील एसटी आगाराचे आगारप्रमुख हरीश मुरलीधर भोई (वय ३०, रा शिरपूर, जि.धुळे, ह.मु.भुसावळ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. भुसावळ आगारात २९ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.आगारातीलच ४९ वर्षीय कर्मचाºयाचा चौकशी अहवाल अनुकूल पाठवावा यासाठी एक हजार रुपयांची लाच हरीश भोई यांनी मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून थेट आगारातच लाच स्वीकारताना पकडले. या कारवाईमुळे एस.टी. विभागांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.दरम्यान, आगारप्रमुख भोई यांना नोकरीस लागण्यास अवघे दोन वर्ष होत आहेत. तत्पूर्वीच भोई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहे.ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपाधीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जी.एम. लोधी, पोलीस निरीक्षक गणेश कदम, सहायक फौजदार रवींद्र माळी, पो.ना.मनोज जोशी, सुनील पाटील, जनार्दन चौधरी, पो.कॉं.प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींनी केली.२९ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई केल्यानंतर ३० रोजी पहाटे चार वाजून २३ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आरोपी भोई यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती सु. प्र. डोरले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने एका महिला कर्मचाºयालाही दोन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी इतर कुणाला अजून पैशांची मागणी केली आहे. याचा तपास करायचा असून साक्षीदारही तपासायचे आहे, असा युक्तिवाद सरकारतर्फे पोलीस निरीक्षक लोधी, सरकारी वकील अ‍ॅड. संजय सोनवणे यांनी केला व चार दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली, तर आरोपीतर्फे जळगाव येथील आर.के. पाटील यांनी युक्तीवाद केला. भोई यास ३ मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.अवघे दोन वर्ष झाले होते नोकरीस लागण्यासदरम्यान, हरीश भाई हे एसटी महामंडळात आगारप्रमुख म्हणून भुसावळ येथे २६ मे २०१७ रोजी नोकरी लागले होते. भुसावळ येथे त्यांनी पहिला पदभार स्वीकारला होता. २६ मे रोजी त्यांच्या नोकरीस दोन वर्षे पूर्ण होणार होती. मात्र तत्पूर्वीच ते लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. भोई हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आहे.एसटीतील आगारप्रमुखाची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यावर भोई याची पहिलीच नियुक्ती भुसावळात झाली होती.

टॅग्स :MONEYपैसाBhusawalभुसावळ