शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 01:39 IST

भुसावळ येथील पंधरा बंगला भागातील रेल्वे हद्दीतील ब्रिटीश काळापासून असलेली अतिक्रमणे मंगळवारी तगडा पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.

ठळक मुद्दे अनेक रहिवासी कुटुंब उघड्यावर रहिवाशांच्या डोळ्यात तरळले अश्रू

भुसावळ : रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातील सर्वच ठिकाणचे अतिक्रमण काढले असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या भुसावळ येथील पंधरा बंगला परिसरातील अतिक्रमित १९० घरे मंगळवारी पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण हटाव करण्यासाठी अनेक बैठका झाल्यानंतर अत्यंत गोपनीय पद्धतीने बंदोबस्त निश्चित होताच मंगळवारी सकाळी ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आले.अनेक वेळा प्रलंबित झालेला पंधरा बंगला परिसरातील अतिक्रमणांचा विषय कधी कमी पोलीस प्रशासनाच्या बलामुळे तर कधी सणासुदीच्या विषयामुळे वारंवार प्रलंबित होत गेला.अनेक वेळा तयारी करून सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त मिळू शकला नाही, यामुळे तारखांवर तारखा पडून अतिक्रमण हटावचा मुद्दे पुढे जात राहिला. शेवटी मंगळवारी रेल्वे प्रशासनाने प्रचंड प्रमाणात बंदोबस्त लावून १९० अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त केली. यासाठी सकाळी ६:३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चार जेसीबी व चार ट्रॅक्टरसह १२० पोलीस कर्मचारी व रेल्वे सुरक्षा बलाचे ८२ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, अतिक्रमण काढताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीईएन तोमर, सेक्शन इंजिनियर मीना, डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक देविदास पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार संजय तायडे, रेल्वे सुरक्षा बलाचे यार्डाचे निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील व कर्मचाऱ्यांनी स्वत: हजर राहून बंदोबस्तात अतिक्रमित घरे व काही धार्मिक स्थळे जमीनदोस्त केले.ब्रिटिशकालीन घरे उद्ध्वस्त केल्याने अनेक कुटुंब रस्त्यावररेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार सूचना व नोटीसा बजावल्या होत्या. अनेकांनी स्थलांतर केले परंतु ज्यांच्याकडे काहीच पर्याय नव्हता ते घरामध्ये होते. प्रशासनाचा मोठा फौजफाटा बघून आता काहीच पर्याय उरला नाही, घर सोडावेच लागेल, या जाणिवेमुळे अनेकांना अश्रू अनावर झाले होते. या घरामध्ये संबंधितांच्या तिसºया पिढ्यांचा निवास होता . अनेकांच्या येथे भावना जुळलेल्या होत्या. यामुळे मन हेलावणारे दृश्य याप्रसंगी दिसून आले .

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण