शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बंदचा दालमिल चालकांना भूर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 12:17 IST

बाहेरील जिल्ह्यातून आणावा लागतोय कच्चा माल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे धान्यासह कडधान्याचीही आवक बंद असल्याने त्याचा फटका दालमिलला बसू लागला आहे. स्थानिक पातळीवर कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितींसह विदर्भातून कच्चा माल आणण्याची वेळ दालमिल चालकांवर आली आहे. विशेष म्हणजे हरभºयाच्या आयातीवर सरकारने पूर्णपणे बंदी घातलेली असल्याने त्याचा अधिक तुटवडा जाणवत असल्याचे दालमिल चालकांनी सांगितले.परवानगी नसताना व्यापारी संकुलासाठी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची तीनशे मीटर भिंत पाडण्यात आल्याने ती जो पर्यंत बांधून दिली जात नाही तोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जळगाव मार्केट यार्ड आडत असोसिएशनने घेतला. त्यामुळे १७ जूनपासून बाजार समितीमध्ये व्यापाºयांचा बंद सुरू आहे़माल उपलब्ध होईनागेल्या ११ दिवसांपासून बंद सुरूच असल्याने येथे माल खरेदी होत नसल्याने त्याचा परिणाम दालमिलवर होऊ लागला आहे. जळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. आधीच सरकारने एप्रिल महिन्यात कडधान्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने केवळ १५ टक्केच कच्चा माल विदेशात आयात करता येत आहे. हे प्रमाण कमी होण्यासह आता बाजार समितीमधील बंदमुळे स्थानिक पातळीवर माल उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.बाहेरील बाजार समितीमधून मालाची खरेदीजळगावात माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितीमधून कच्च्या मालाची खरेदी केली जात आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात माल उपलब्ध होत नसल्याने दालमिल चालकांना अकोला, अमरावती, खामगाव येथे धाव घेऊन तेथून कच्चा माल आणावा लागत आहे. यात प्रवास खर्च वाढल्याने दालमिल चालकांना भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.उत्पादनावर परिणाम नाहीकच्चा माल उपलब्ध होत नसला तरी उत्पादन थांबलेले नाही. मात्र इतर शहरांमधून कच्चामाल आणावा लागत असल्याने खर्च वाढला असला तरी मागणी नसल्याने डाळींचे भाव वाढविता येत नसल्याचेचित्रआहे.त्यामुळे हा भूर्दंड दालमिल चालकांनाच सहन करावा लागत आहे.दालमिलचा मोठा आधारजळगावातील उद्योगांची स्थिती बिकट असताना दालमिल कसेबसे सावरून उद्योग वाढीला हातभार लावत आहे. त्यात अशा प्रकारच्या बंदमुळे उद्योगांवर परिणाम होत असेल तर ते उद्योगांसाठी मारक असल्याने बंदसंदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकाºयांनी लक्ष घालून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे दालमिल चालकांचे म्हणणे आहे.बाजार समितीमधील व्यापाºयांनी पुकारलेल्या बंदमुळे स्थानिक पातळीवर कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील इतर बाजार समितींसह अकोला, खामगाव, अमरावती येथून कच्चा माल आणावा लागत आहे. त्या मुळे कच्च्या मालासाठी खर्च वाढलेला आहे.- प्रेम कोगटा, अध्यक्ष, जळगाव दालमिल ओनर्स असोसिएशन

टॅग्स :Jalgaonजळगाव