शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पगारवाढीचा परस्पर ठराव करणे भोवले, जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकांना प्रवेशद्वारावरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:27 IST

‘रिलिव्ह लेटर’ घेण्यास नकार देत गेले सुट्टीवर, लेखा व्यवस्थापक के.बी. पाटील प्रभारी एमडी

जळगाव : स्वत:चा पगार स्वत:च गुपचूप वाढवून घेत इतिवृत्तात नोंद करणारे जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक (एमडी) संजीवकुमार गौतम यांनी मंगळवारी पदमुक्त करण्याचे पत्र (रिलिव्ह लेटर) घेण्यास नकार देत सुट्टी टाकून निघून गेले. तत्पूर्वी त्यांना दूध संघाच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले होते. त्या नंतर त्यांनी वाहन दूध संघात लावले व निघून गेले. दरम्यान, कार्यकारी संचालक पदाचा (एमडी) प्रभारी पदभार संघाचे लेखा व्यवस्थापक के.बी. पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.जिल्हा दूध संघाचे कार्यकारी संचालक (एमडी) संजीवकुमार गौतम यांनी स्वत:चा पगार स्वत:च गुपचूप वाढवून घेऊन तो विषय बैठकीच्या इतिवृत्तात परस्पर घुसविल्याचे इतिवृत्त मंजुरीपूर्वी संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे या बाबत गौतम यांना या बाबत सूचना देत पगारवाढीस नकार दिला होता व १ फेबु्रवारी रोजीच त्यांचा राजीनामा घेण्यात आला. सोमवार, ३ फेबु्रवारी रोजी त्यांना पदमुक्त करण्यात येणार होते. मात्र गौतम हे दूध संघात आलेच नाही, असे खडसे यांनी सांगितले.९० हजाराने वाढविला पगारगौतम यांनी इतिवृत्तात नोंद करताना ९० हजार रुपये पगार वाढीची नोंद केली होती. मात्र गौतम यांच्या मुलाखतीवेळी पगार ठरविला व तसे नियुक्ती पत्र दिले होते. त्यामुळे मध्येच पगार वाढ देणे शक्य नाही, असे खडसे यांचे म्हणणे आहे.प्रवेशद्वारावरच रोखलेमंगळवारी गौतम हे दूध संघात आले असताना त्यांना प्रवेशद्वारावरच रोखण्यात येऊन प्रवेश देण्यास नकार देण्यात आला. मात्र त्यांचेकडे असलेले वाहन त्यांनी दूध संघात लावले व ते निघून गेले.पत्र घेण्यास नकार, लेखा व्यवस्थापकांकडे पदभारमंगळवारी गौतम यांना दूध संघातर्फे पदमुक्त करण्यात येणार होते. यात त्यांना पदमुक्तीचे पत्र देण्यात आले, मात्र त्यांनी ते घेण्यास नकार दिला व सुट्टी टाकून निघून गेल्याची माहिती मंदाकिनी खडसे यांनी दिला. पदमुक्तीचे पत्र गौतम यांनी घेतले नसले तरी दूध संघाने त्यांना एकतर्फी पदभार काढून घेत संघाचे लेखा व्यवस्थापक के.बी. पाटील यांच्याकडे पदभार सोपविला.पगारवाढीची इतिवृत्तात नोंद करताना गौतम यांनी अध्यक्षांची परवानगी घेतलेली नव्हती. केवळ दोन ते तीन संचालकांशी चर्चा केली होती व त्यांनी त्यास अनुमतीही दर्शविली होती, असेही मंदाकिनी खडसे यांचे म्हणणे आहे.राजकीय दबावातून आपल्याकडून राजीनामा घेण्यात आला आहे. या बाबत कोणत्याही प्रकारची नोटीस न देता राजकीय दबावातून राजीनामा घेतला.- संजीवकुमार गौतम, कार्यकारी संचालक, जिल्हा दूध संघसंजीवकुमार गौतम यांनी परस्पर स्वत:च्या पगार वाढीचा ठराव इतिवृत्तात नोंद केला होता. तसे करणे चुकीचे असून त्यांना पुन्हा संधी देणेही चुकीचे आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला सांगितला. राजकीय आरोपाबाबत त्यांना कोणी सांगितले असेल म्हणून ते तसे बोलत असतील.- मंदिकीनी खडसे, अध्यक्षा, जिल्हा दूध संघ

टॅग्स :Jalgaonजळगाव