शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंतुर्ली येथे जलक्रांतीतर्फे महाश्रमदानातून भामदरा नाल्याचे खोलीकरण तर मानमोडी नाल्यावर बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 16:20 IST

अंतुर्ली येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जलक्रांती अभियान ग्रामस्थांतर्फे महाश्रमदान करण्यात आले. भामदरा नाल्याचे खोलीकरण, तर मानमोडी नाल्यावर बंधारा बांधण्यात आला.

ठळक मुद्देजलसंकट टाळण्यासाठी नाला खोलीकरणाच्या कामाला सुरवातभामदरा नाल्याला बरीचशे लहान लहान नाले येऊन मिळतातया नाल्याचे खोलीकरण करुन पाणी अडविण्यात आले तर पाण्याची पातळी वाढेलयाचा शेतकऱ्यांनाच होणार मोठ्या प्रमाणावर फायदा

अंतुर्ली/मुक्ताईनगर, जि.जळगाव : अंतुर्ली येथे पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जलक्रांती अभियान ग्रामस्थांतर्फे महाश्रमदान करण्यात आले. भामदरा नाल्याचे खोलीकरण, तर मानमोडी नाल्यावर बंधारा बांधण्यात आला.या महाश्रमदान कार्यक्रमाच्या ठिकाणी गावासह परिसरातील जवळपास ३०० जणांनी आपला सहभाग नोंदविला. अंतुर्ली हा परिसर तापी काठावर आहे. असे असल्यावरसुद्धा यावर्षी परिसरात दरवर्षीच्या तुलनेत पाण्याच्या पातळी खालावली आहे. यामुळे भविष्यात जलसंकट निवारण करण्यासाठी ग्रामस्थांनी या कार्यास सुरवात केली. गावात आणखी वेगवेगळ्या पद्धतीने पाणी अडवणे तसेच जिरवण्यासाठी विविध पर्याय निवडण्यात येतील. तसेच गावात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचा मानसही जलक्रांती अभियान तसेच समस्त ग्रामस्थांचा आहे. ग्रामस्थांनी या कायात उस्त्फूर्त सहभाग नोंदविला.गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या अत्यल्प वृष्टीमुळे भूगर्भातील पाणी व तापी नदी आणि इतर जलाशय हे घटले आहेत. पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या मुद्यावर संपूर्ण अंतुर्ली ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक एकत्रित येऊन आपल्या परिसरातील पाण्याची उपलब्धता कशाप्रकारे वाढेल याचा विचार करत हे श्रमदान शिबिर राबवण्यात आले.या नाल्याचे खोलीकरण करून पाणी अडवण्याचे कामही श्रमदानातून हाती घेण्यात आले आहे. यासाठी गावकरी, शेतकरी, वेगवेगळ्या संघटनांनी पुढाकार घेऊन नाल्याचे खोलीकरण व बंधाºयाचे काम हाती घेऊन कामाला सुरवात केली. यात नरेंद्र दुट्टे, दिनकर पाटील, डी.आर.महाजन, कैलास दुट्टे, सुनील तराळ, मोहन बेलदार, मोहन बारी, श्रीकांत पाटणकर, विलास दुट्टे, दत्तू पाटील यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांनी श्रमदान केले. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर