वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : भैरवनाथांच्या पालखी मिरवणुकीने सावखेडा बुद्रूक, ता.पाचोरा येथे यात्रोत्सवाची सोमवारी रात्री सांगता झाली.पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी भैरवनाथ देवस्थान सावखेडा बुद्रूक येथे यात्रोत्सव साजरा करण्यात येतो व त्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी परंपरेनुसार परिसरातील सावखेडा बुद्रूक, सावखेडा खुर्द, वरखेडी बुद्रूक, भोकरी, वरखेडी खुर्द व लासुरे गावातून रोषणाई करून सजविलेल्या बैलगाडीतून भैरवनाथ महाराजांची वाजत-गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली.स्वत: श्री भैरवनाथ महाराज आपल्या दाराशी आल्याचा दर्शन लाभ भाविक नतमस्तक होऊन घेतात. दारोदारी पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच पूजाअर्चा करून प्रसाद व दर्शनाचा लाभ घेतला. ‘भैरवनाथ महाराज की जय’च्या जयघोषात रात्रभर हा पालखी सोहळा सुरू होता. सकाळी-सकाळी पालखी सोहळा भैरवनाथ देवस्थान याठिकाणी पोहचला व यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली.या पालखी सोहळा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.गजेंद्र पाटील व सहकाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला.
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथे भैरवनाथांच्या पालखी मिरवणुकीने यात्रोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 15:58 IST
भैरवनाथांच्या पालखी मिरवणुकीने सावखेडा बुद्रूक, ता.पाचोरा येथे यात्रोत्सवाची सोमवारी रात्री सांगता झाली.
पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथे भैरवनाथांच्या पालखी मिरवणुकीने यात्रोत्सवाची सांगता
ठळक मुद्देदोन दिवसीय यात्रोत्सवात परिसरातील भाविकांचा सहभागदर्शनासाठी भाविकांनी केली होती गर्दीसजविलेल्या बैलगाडीतून भैरवनाथ महाराजांची वाजत-गाजत पालखी मिरवणूक