शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

भवरलालजींचे सूक्ष्म सिंचनासाठीचे योगदान ‘नोबेल’ पुरस्काराच्या तोडीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:20 AM

राज्यपालांचे गौरवोद्गार : अशोक जैन यांनी स्वीकारला ‘परमार्थ रत्न’ पुरस्कार

ठळक मुद्देअत्यंत साधी जीवनशैली आयुष्यभर अंगीकारून सामान्यातून असामान्य कार्यलाखो अल्पभूधारक शेतकºयांना केले समृद्ध.राज्यपाल सी. विद्यासागर राव व न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते पुरस्कारजगातील १२० देशात आपल्या व्यवसायाचा विस्तार

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचे सूक्ष्म सिंचनासाठीचे योगदान ‘नोबेल’ पुरस्काराच्या तोडीचे आहे. भवरलालजींनी ग्रामीण भारतात उच्च कृषी तंत्रज्ञान व मायक्र ो इरिगेशनद्वारे (सूक्ष्म सिंचन) लाखो अल्पभूधारक शेतकºयांना समृद्ध केले. त्यामुळे त्यांचे योगदान नक्कीच नोबेल पुरस्काराच्या तोडीचे आहे असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले..मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे रविवारी परमार्थ सेवा समितीतर्फे दिवंगत भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्याचा ‘परमार्थ रत्न’ सन्मानाने गौरव करण्यात आला. राज्यपाल सी. विद्यासागर राव व न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अत्यंत साधी जीवनशैली आयुष्यभर अंगीकारून सामान्यातून असामान्य कार्य त्यांनी निर्माण केले. केवळ ७ हजार रुपये भांडवलावर त्यांनी चार दशकांनंतर जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवणारी बहुराष्ट्रीय कंपनी नावरु पास आणली, असेही राज्यपाल म्हणाले.जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सोहळ््यास संघपती दलूभाऊ जैन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कल्पतरु चे अध्यक्ष मोफतराज मुणोत, सुप्रिमचे अध्यक्ष महावीर तापडीया, पिरामल गृपचे दिलीप पिरामल, बिझनेस इंडियाचे अशोक अडवानी, बीग बाजारचे अध्यक्ष किशोर बियाणी, आयडीबीआयचे कार्यकारी संचालक अभय बोंगीरवार, परमार्थ सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण बियाणी आदी उपस्थित होते.गांधी विचारांवर नितांत श्रद्धालोकसहभागावर त्यांचा अधिक विश्वास होता. गांधी विचारांवर श्रद्धा ठेवत विश्वस्ताच्या भूमिकेतून उद्योगाला आकार देणाºया उद्योगपतींमध्ये जमनालाल बजाज यांच्यानंतर त्यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल, असे ज्येष्ठ गांधीवादी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणाले.भाऊंच्या आठवणींनी आज आमचे मन भरुन आले असून अवघ्या ७९ वर्षांच्या आयुष्यात जगातील १२० देशात आपल्या व्यवसायाचा विस्तार त्यांनी साध्य केला. शेतकºयांसाठी कृषी उद्योगाला आकार दिला. वैश्विक विस्तार साध्य करुनही त्यांनी मुख्यालय जळगावलाच ठेवल्याचे अनिल जैन यांनी आवर्जून सांगितले.