शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 23:31 IST

संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तथा भावार्थदीपिका या ग्रंथाद्वारे जगासमोर उच्च कोटीचे तत्वज्ञान मांडले. या ग्रंथाचे अध्ययन कसे करावे, यावर ...

संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी तथा भावार्थदीपिका या ग्रंथाद्वारे जगासमोर उच्च कोटीचे तत्वज्ञान मांडले. या ग्रंथाचे अध्ययन कसे करावे, यावर संत एकनाथ महाराजांनी आचारसंहिता सांगितली आहे.भाव धरोनिय वाची ज्ञानेश्वरी ।कृपा करी हरी तयावरी ।। जर मनात भाव नसेल तर ज्ञानेश्वरी वाचू नये असे संत एकनाथ महाराजांना म्हणावयाचे आहे. मनात भाव असल्याशिवाय ज्ञानेश्वरीचा प्रभाव कसा जाणवेल? हरी कृपा कशी करेल? मनात भाव धरूनच ज्ञानेश्वरी वाचावी, मगच हरी त्या वाचणाऱ्यावर कृपा करेल. ज्ञानेश्वरीतील एक एक शब्द म्हणजे अमृताचे थेंब आहेत. या शब्दात सागराएवढा अर्थ भरला आहे. संत जनाबार्इंनी तर स्पष्ट शब्दात सांगितले आहे.वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी। ज्ञान होय अज्ञानासी, ऐंसा वर या टिकेशी ।।जर वाचायचे असेल तर ज्ञानेश्वरी वाचा आणि डोळ्यांनी पंढरी पहा. अज्ञानी माणसाला देखील ज्ञान प्राप्त होतं, जर भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली तर, कारण या ग्रंथाला असा वर आहे. परंतु सामान्य माणसांना हे पटणं अवघड जातं, कारण अशा प्रकारच्या ग्रंथसंपदा वाचता-वाचता संशय येतो आणि हा संशय श्रद्धेचा नाश करतो. त्यासाठी संत एकनाथ महाराजांनी सांगितले आहे.एका जनार्दनी संशय सोडोनि । दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ।।श्रीकृष्णानीदेखील गीतेच्या चौथ्या अध्यायात संशयाबाबत सविस्तर वर्णन केले आहे आणि माऊलींनी तर अगदी सर्वांना समजेल असे दृष्टांतासकट यावर भाष्य केले आहे.मनुष्य संशयात पडला की, नि:संशय नाश पावतो व तो ऐहिक सुखाना मुकतो. एकदा माणसाला संशयाने ग्रासले की, त्याला खरे-खोटे, चांगले-वाईट काहीच समजत नाही.ज्याप्रमाणे जन्मांध पुरुष रात्र व दिवस ओळखत नाही. त्याप्रमाणे संशयात पडलेल्या मनुष्याच्या बुद्धीला दुसºयाचे सांगणे मुळीच पटत नाही. विज्ञानाने देखील आता मान्य केले आहे की, संशय हा एक आजारच आहे. आणि हा आजार फार मोठा भयानक आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,म्हणूनि संशयाहुनि थोर । आणिक नाही पाप घोर । हा विनाशांची वागुर । प्राणियांसी ।।संशायाहून दुसरे अत्यंत घोर पातक नाही. संशय हे प्राण्याच्या सर्वनाश करणारे जाळे आहे.भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे अर्जुना म्हणून, तू या संशयाचा त्याग कर. प्रथम संशयाला जिंक. हा संशय जेथे यथार्य ज्ञान नाही, तेथेच असतो. संशय श्रद्धाच बसू देत नाही. हा संशय वाढला की, तो बुद्धीलाही भ्रष्ट करतो.ज्ञानोबांच्या या विवेचनावरून संशय किती भयानक असतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. संसारात असो, परमार्थात असो, आणि कोठेही असो याचा त्याग करणे गरजेचे आहे. नाहीतर हा संशय बुद्धी भ्रष्ट केल्याशिवाय राहत नाही.सर्व शास्त्रात सांगितले आहे की, संशय नसावा तर चौकशी असावी. ज्याच्या मनात संशयाने प्रवेश केला त्याला काही बरे वाटत नाही आणि माऊलींनी सांगितल्याप्रमाणे संशयासारखे मोठे पातक नाही; म्हणूनच संशयाचा त्याग करण्यासाठी भगवंताची कृपाच लागते.- डॉ.कैलास पाटील, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव