शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

हज यात्रेसाठी गेलेल्या जळगावच्या निवृत्त परिचारिकेकडे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 9:56 PM

मक्का मदीना येथे हजयात्रेला गेलेल्या राबीयाबी तुराब खान (रा.रामनगर,शिरसोली नाका, जळगाव) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली. ही घरफोडी भरदिवसा झाल्याचा संशय आहे. 

ठळक मुद्देराम नगरातील घटनालाखो रुपयांचे दागिने लांबविलेकडीकोयंडा व कुलूप तोडले

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१: मक्का मदीना येथे हजयात्रेला गेलेल्या राबीयाबी तुराब खान (रा.रामनगर,शिरसोली नाका, जळगाव) यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली. ही घरफोडी भरदिवसा झाल्याचा संशय आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शिरसोली नाक्यावरील रामनगरात राबीयाबी खान या एकट्या राहतात. त्या महापालिकेच्या सिंधी कॉलनीतील दवाखान्यात परिचारिका होत्या. ५ फेब्रुवारी रोजी त्या घराला कुलूप लावून हज यात्रेला गेल्या होत्या. या काळात त्यांच्या घरी तांबापुरात राहणाºया भावाची मुलगी समरीन खान मुसरबी व भावाची सून नौशाद बी व लहान मुलगा महम्मद अली असे तिघं जण राहत होते. बुधवारी पहाटे नळांना पाणी येणार असल्याने तिघं जण मंगळवारी घराला कुलूप लावून तांबापुरात गेले होते. रात्रभर ते तिथेच थांबले. बुधवारी दुपारी चार वाजता घरी आले असता घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला होता तर कुलूपही गायब झालेले होते.सोने ठेवण्याच्या रिकाम्या डब्या पलंगावरघरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता. तीन कपाट उघडे होते.त्यातील तिजोºयाही तोडण्यात आल्या होत्या. कपाटात ठेवलेले दागिने गायब झालेले होते. तर दागिन्यांच्या डब्या रिकाम्या पलंगावर आढळून आल्या. सर्वच खोल्यांमध्ये चोरट्यांनी शोधाशोध केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. या घरात राबीयाबी एकट्याच राहतात. त्या अपंग आहेत. गुरुवारी सकाळपर्यंत त्या जळगावात पोहचणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्या आल्यावरच मुद्देमालाबाबत स्पष्ट होईल.