शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

अमळनेर येथील अधिकाऱ्याची सपत्नीक बुलेटवर भूतानस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:01 IST

आवड असली की सवड ही आपोआप निर्माण होते.. असाच काहीसा प्रकार शासकीय सेवेत असलेल्या एका अधिकाºयाच्या बाबतीत घडला. या अधिकाºयांनी भारताचा शेजारी असलेला भूतामनध्ये चक्क बुलेटवर सवारी केली. तीही सात दिवस. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीही सोबत होत्या.

ठळक मुद्देगोव्यासह अनेक राज्यात बुलेटस्वारीभुतानमधील सर्व सरकारी कार्यालये सकाळी नऊ वाजता सुरूथिंपूजवळ असलेली ‘‘गोल्डन बुद्धाची’’ मूर्ती हे भूतानचे वैशिष्ट.

चुडामण बोरसे ।आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२९ : आवड असली की सवड ही आपोआप निर्माण होते.. असाच काहीसा प्रकार शासकीय सेवेत असलेल्या एका अधिकाºयाच्या बाबतीत घडला. या अधिकाºयांनी भारताचा शेजारी असलेला भूतामनध्ये चक्क बुलेटवर सवारी केली. तीही सात दिवस. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीही सोबत होत्या.अजित मुठे. मूळ रा. अमळनेर (जि. जळगाव). ते सध्या नगर येथे प्रथम वर्ग लेखा परीक्षक वर्ग -१ (सहकारी संस्था) म्हणून कार्यरत आहे. सध्या ते नाशिकला वास्तव्यात आहेत. यापूर्वीही त्यांनी गोव्यासह अनेक राज्यात बुलेटस्वारी केली आहे.निसर्ग सौंदर्याने नटलेल्या डोंगर दºया उंच-उंच पर्वत रांगा, जागोजागी बौद्ध मॉनेस्ट्री व स्तुप, विविध पेंटींग्ज करणारे कलाप्रेमी नागरिक व अतिशय शिस्त प्रिय असलेल्या या देशात अजित यांनी बाईकने जायचे ठरविले. मित्रांमध्ये चर्चा झाली. सर्वांनी होकार दिला. नंतर अजित फक्त एकटेच राहिले. शेवटी मग अजित यांच्यासोबत पत्नी नेहा यांनीही जाण्याचा निर्णय घेतला. नाशिकहून बाईकने जाणे कठीण होते. शेवटी मग नाशिक येथील हायकर क्लबच्या मयुर पुरोहित यांची मदत झाली. त्यांनी बुलेट बुक करण्यासाठी मदत केली. या देशात बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. मंगोलियन वंशाच्या लोकांची भाषा, पोषाख, जीवन पद्धती पूर्णत: वेगळी आहे.अजित हे मुंबई ते सिलिगुडी विमानाने पोहचले. तिथे भाड्याची बुलेट घेतली. आणि मग दुसºया दिवसापासून भूतान आॅन बुलेटचा अनोखा आणि रोमांचकारी प्रवास सुरु झाला. भूतान या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे सर्वात प्रथम स्वत:चे व वाहनाचे प्रवेश पत्र घ्यावे लागते. फुंन्टशोलींग येथे दूतावास आहे. तेथे हे प्रमाणपत्र दिले जाते. इथले वैशिष्ट्ये म्हणजे भुतानमधील सर्व सरकारी कार्यालये सकाळी नऊ वाजता सुरू होतात आणि सर्व कर्मचारी नऊ वाजता कार्यालयात उपस्थित असतात. आता वाटेत लागणाºया चौक्यांवर पास दाखवून त्यावर संबंधित अधिकाºयाची स्वाक्षरी व शिक्का घ्यावा लागतो.इथे अनेक ठिकाणी वळणा-वळणाचा व प्रचंड चढ असलेला घाटाचा रस्ता आहे. मात्र व्हॅन चालविणाºया महिला चालक अतिशय वेगात व सफाईदारपणे त्यांची कार चालवित असतात. .थिंपूजवळ असलेली ‘‘गोल्डन बुद्धाची’’ मूर्ती हे भूतानचे वैशिष्ट. थिंपूजवळ आठ-दहा किलोमिटर वर एक उंच टेकडीवर ही जवळ-जवळ ११९ फुटांची सोनेरी रंगाची ही ‘‘शाक्यमुनी बुद्धमूर्ती’’ आहे. ज्याचे बांधकाम भुतानचे राजे जिग्मे सिग्मे वांगचूक यांच्या काळात झाले आहे. दि.२५ सप्टेंबर २०१५ ला ही मूर्ती स्थापन झाली. भुतानचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे एका उंच पर्वतावर ‘‘टायगर नेस्ट’’ मॉनेस्ट्री. ट्रेकींग करत व घोड्यावरूनही जाता येते. जवळ- जवळ ३ ते ४ तासाची ही पायºया पायºयांची चढण आहे.