शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्री वॉटर इंडिया मिशन’साठी चित्रपट सहदिग्दर्शकाची भारत भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:29 IST

झारखंडचे रहिवासी श्रीराम डल्टन दररोज करताहेत २५ ते ३० किलोमीटर पायी प्रवास

अमळनेर, जि.जळगाव : जल, जंगल, जमिनीवर मानवाचा हक्क आहे, असे सांगत ‘फ्री वॉटर इंडिया मिशन’साठी तब्बल १०० किलोचा दगड सायकलवर लोटत झारखंडचे रहिवासी तथा चित्रपट सृष्टीतील सहदिग्दर्शक श्रीराम डाल्टन आपल्या सहकाऱ्यांसोबत भारतभर पायी प्रवास करून जनजागृती करत आहेत.जल, जंगल, जमीन हा आपला मूलभूत हक्क आह,े हे संविधानापुरते मर्यादित राहिले आहे, पाणी विकत घ्यावे लागत आहे, सर्वांना पाणी मोफत मिळावे यासाठी फ्री वॉटर इंडिया मिशनअंतर्गत चित्रपट सहदिग्दर्शक श्रीराम डाल्टन यांनी १५ मेपासून मुंबई येथून पदयात्रा काढली आहे. एका सायकलवर त्यांनी निसर्गाचे प्रतीक म्हणून १०० किलोचा दगड, एक रोपटे व पाण्याचे भांडे ठेवले असून, ते लोटत भारत भ्रमण करीत आहेत. दर दोन ते तीन कि.मी.वर रस्त्यात लोकांची गर्दी जमली की त्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करतात. त्यांच्यासोबत बिहारचे विभू वत्स, विनीत चौधरी झारखंड, शशिकांत कुमार झारखंड हेदेखील सहकार्य करीत आहेत.मुंबई येथून निघाल्यानंतर विविध गावे करत सुमारे १००० कि.मी.चा प्रवास करत ते ५० व्या दिवशी अमळनेरात पोहचले. म.वा.मंडळाचे डॉ.अविनाश जोशी, रमेश पवार, संदीप घोरपडे, भारती गाला, नरेंद्र निकम, वसुंधरा लांडगे, जगदीश तावडे, भूमिका घोरपडे यांनी त्यांचे स्वागत केले.नाशिक येथील नीलेश धीरे यांनी खास शिल्पकला करून १०० किलोच्या दगडावर जल, जंगल व पाण्याचे प्रतीक कोरण्यात आले आहे, तर रमेश अय्यर यांनी रोपटे आणि पाण्याचे भांडे दिले आहे. कडक उन्हाळ्यातही ते रोपटे जिवंत ठेवून अखेर त्यांना झारखंडपर्यंत न्यायचे आहे.दररोज २५ ते ३० कि.मी.प्रवास करतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश परत महाराष्ट्र, तेलंगणा, ओरिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड असा त्यांचा प्रवास राहणार आहे.