शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सावधान....अश्लील फोटो, व्हिडिओ दाखवून होतेय ब्लॅकमेलिंग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:18 IST

जळगाव : तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर सावधान होण्याची गरज आहे. सध्या ‘सेक्सटॉर्शन’ करणारे रॅकेट सक्रिय ...

जळगाव : तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत असाल तर सावधान होण्याची गरज आहे. सध्या ‘सेक्सटॉर्शन’ करणारे रॅकेट सक्रिय झाले असून सोशल मीडियावर तरुणी अथवा महिलेच्या बनावट नावाने मैत्री केली जाते, नंतर अश्लील व्हिडिओ कॉल केले जात असून त्याद्वारे खंडणी मागितली जात असल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. गेल्याच आठवड्यात जळगाव शहरातील एक वकील याला बळी पडले. त्याआधी मुक्ताईनगरातील उच्चभ्रू व्यक्तीही अशीच शिकार झाली. सायबर पोलिसांकडे अशा तक्रारींचा ओघ वाढतच चालला आहे.

सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या मार्गे होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीचे बहुतांश प्रकार प्रचलित आहेत. आता मात्र सायबर टोळ्यांनी ‘सेक्सटॉर्शन’च्या माध्यमातून पैसे उकळण्याचा नवीनच प्रकार सुरू केला आहे. जिल्ह्यात अनेक जण या ‘सेक्सटॉर्शन’चे बळी ठरले असून सहा जणांनी थेट सायबर पोलिसांशी संपर्क साधून आपबिती कथन केली आहे. फेसबुकसह मेसेजिंग ॲप, डेटिंग ॲप, पॉर्न साईट आदी ठिकाणी सायबर गुन्हेगार बनावट खाती बनवून पीडित व्यक्तींच्या संपर्कात येतात.

खातेधारक व्यक्ती ही हायप्रोफाईल व सुंदर तरुणी असल्याचे भासविले जाते. प्रथम पीडित व्यक्तीसोबत चॅटिंग करून मैत्री केली जाते. नंतर प्रेमाच्या गप्पा करून अश्लील बोलण्यात गुंतविले जाते. बहुतांशवेळा समोरील व्यक्ती पीडित व्यक्तीला फेसबुक व व्हॉट‌्सॲपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करून एकांतात जाण्यास सांगते. यावेळी त्याला नग्न होण्यास सांगून अश्लील हावभाव करण्यास भाग पाडले जाते. याचवेळी स्क्रीन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून व्हिडिओ चित्रित केला जातो. त्यानंतर पीडित व्यक्तीला त्याचा व्हिडिओ व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जाते. बदनामीच्या भीतीपोटी अनेक जण सायबर गुन्हेगारांना ऑनलाइन पैसे पाठवितात तर काही जण सायबर पोलिसांकडे तक्रारी करतात. शहरात वकिलाने सुरुवातीला पैसे पाठविले, नंतर थेट गुन्हाच दाखल केला. मुंबईत नुकताच एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीच्या ऑनलाइन संपर्कात येऊन त्याचा मोबाइल, कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपमध्ये घुसखोरी करणे, त्या व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून

अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणे, व्हिडिओ, छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणे.

कोणाला केले जाते लक्ष्य

सायबर गुन्हेगार पीडित व्यक्तीला जाळ्यात ओढण्याआधी फेसबुकवर आधी त्याची प्रोफाईल पाहतात. ही व्यक्ती डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, वकील अथवा उच्चपदस्थ नोकरी करणारी असेल तर त्यांना फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली जाते. शहरासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले असून काहींनी भीतीपोटी पैसेही दिले आहेत.

बळी ठरू नये म्हणून काय काळजी घ्याल...

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. व्हिडीओ कॉलवर समोरील व्यक्ती सांगेल तसेच कृत्य करू नये. आपल्या फोनमध्ये अश्लील फोटो, व्हिडिओ सेव्ह करून ठेवू नये. ‘सेक्सटॉर्शन’ संदर्भात काही घटना घडली तर कुणालाही पैसे देऊ नयेत. यासंदर्भात तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी केले आहे.

कोट...

आपले सोशल मीडियाचे खाते हे लॉक असावे. तशी सेटीिग मोबाइलमध्ये करता येते. सेव्ह क्रमांकाच्या व्यतिरिक्त आपली वैयक्तिक माहिती किंवा फोटो कोणाला दिसत नाहीत. शक्यतो वैयक्तिक स्वत:चे फोटो सोशल मीडियावर नसावेत. सेक्सटॉर्शन’चा प्रकार घडला तर धमकीला न घाबरता थेट सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.

-बळीराम हिरे, पोलीस निरीक्षक,सायबर पोलीस स्टेशन