आसा ईचार करीसन खेडाना दोन मित्र सकायलेच बाराना शिनेमा देखा साठे एस टी बसनी जयगांव मा दाखल होतस. पण बजारसारखा बजार व शनिवार आशी सण बट्टा दुकाने बंद. आही देखीसण त्या गोंधही गयात. काय करानं गड्या आत्या त्यासलेभी काही सुचेना. ईतलामा शहरमा गस्तीवर ना पोलीस दादानी यासले शिट्टी मारी. दंडुका उगारीसन काय करी-हायनात ईकडे, तुम्हले माहीत नही का कोरोना ना नियममुये शनिवारले जयगांव बंद शे. तुम्हना तोंडवर मास नही शे. आते तुम्ही दंडनी पावती फाडी ल्या अन गुप चुप घर निंघी जा. पोलीस दादा दंड भरान पुस्तक काढत नही तोवर
दोन्ही मित्रसनी जोरमा धुम ठोकी खरं. पण पावसायान पाणी, रस्तामा खड्डा, खड्डामां चिखल यामुये त्यासले धड पयताभी येत नव्हतं. ईतलामा एक मित्रनी चप्पल चिखलमा फसी गयी. तिले तो तशीच सोडीशन त्यानं पोलीस दादापासून जिव बचाडी सन तेची कशी बशी सुटका करी लिधी आणि व्हयनी त्या फजीती मुये त्या अपसुकच बोलतस. काय भो हाई जयगंवशे का काय. आठला रस्ता तर भलताच खराब शे भो. याना पेक्षा आपला गांवमधला रस्ता बरा.
शालिग्राम पवार, शिरसोली