याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील बनारस येथील प्रमोद पटेल (३२) हा युवक रेल्वेने अल्पवयीन १६ वर्षाच्या खुशी (नाव बदललेले) या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून विनातिकीट प्रवास करीत पळवून नेत होता. या वेळी रेल्वे तिकीट निरीक्षकाने त्यांच्याकडे तिकीट मागितल्यावर ते विनातिकीट प्रवास करीत असल्याचे लक्षात आले. त्याला विचारपूस केल्यावर तो अल्पवयीन मुलीला घरातून पळून नेत असल्याचे समोर आले. त्यामुळे रेल्वे तिकीट निरीक्षकाने अमळनेर रेल्वे पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पटेल याला मुलीसह अमळनेर रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सहायक उपनिरीक्षक मधुकर विसावे यांनी मुलीच्या घरी फोनवर माहिती दिली. याप्रकरणी रोहनिया जनपथ वाराणसी (बनारस) पोलिस ठाण्यात पटेल याच्याविरुद्ध भादंवि ३६६, ३६३ व पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बनारसचे पोलिस उपनिरीक्षक उमेश कुमार राय यांनी दिली. त्यानंतर बनारसचे पोलिस अमळनेर रेल्वे पोलिस ठाण्यात आल्यावर दोघांना सहायक उपनिरीक्षक मधुकर विसावे व हेड कॉन्स्टेबल राजू निकम यांनी त्यांच्या ताब्यात दिले.
अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या बनारसचा युवक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST